Nagpur Political News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'ड्रिम प्रोजेक्ट' असलेल्या समृद्धी महामार्गाला 'ब्रेक' लागण्याची शक्यता आहे.
या महामार्गावरच्या गंभीर अपघातांची मालिका संपलेली नाही. सुरक्षिततेच्या समस्यांचे निराकरण होईपर्यंत महामार्गावरून वाहतूक तात्पुरती थांबवण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका अनिल वडपल्लीवार यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली आहे.
याचिकेवर चार आठवड्यात उत्तर द्या, असा आदेश न्यायमूर्ती अतुल चांदूरकर व न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी राज्य सरकार व एमएसआरडीसीला दिला आहे.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर वाहतुकीला परवानगी देण्यापूर्वी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात याव्यात, सुरक्षिततेच्या समस्यांचे निराकरण होईपर्यंत महामार्गावरून वाहतूक तात्पुरती थांबवावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. तज्ज्ञ पॅनलची स्थापना, चिन्हे, वाहन तपासणी, प्रथमोपचार क्लिनिकची सुविधा आदी उपाय याचिकेत सुचवले आहेत.
समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासासाठी विदर्भ आणि मुंबईला जोडण्यासाठी असलेला महत्त्वकांक्षी महामार्ग आहे. जवळपास साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग बांधण्यात येत आहे. पण सध्या काम पूर्ण झालेल्या मार्गावर अपघातांची संख्या वाढत असून हा मार्ग मृत्यूचा सापळा आहे का, अशी टीका होत आहे. अद्यापपर्यत लहान-मोठे असे एक हजारांपेक्षाही अधिक अपघात 'समृद्धी'वर झाले आहेत.अनेकांचे प्राण गेले आहेत.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.