Samruddhi Highway Accident : अपघातातील मृतांची ओळख पटविण्यात मोठी अडचण; सामूहिक अंत्यसंस्काराचा निर्णय

Samruddhi Bus Accident News : समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला.
Accident at Samruddhi Highway
Accident at Samruddhi HighwaySarkarnama
Published on
Updated on

Samruddhi Bus Accident News : समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला. या अपघातात 25 प्रवाशांच्या होरपळून मृत्यू झाला. यात वर्ध्यातील 14 जणांचा समावेश आहे. या सर्वांवर रविवारी बुलडाण्यात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह प्रमाणात भाजले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांशी चर्चा करून रविवारी बुलडाण्यातच (Buldana) त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. बुलडाणा येथे गेलेले वर्ध्याचे तहसीलदार रमेश कोळपे यांनी ही माहिती दिली.

Accident at Samruddhi Highway
Buldana Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर वाहन पेटल्यास मृत्यू अटळ, ‘हे’ आहे कारण...

या अपघाताची (Accident) माहिती मिळताच प्रवाशांचे नातेवाईक आधीच बुलडाणा येते पोहोचले आहेत. अपघाताविषयी कळताच वर्धा जिल्हा प्रशासनाचे दोन पथक व पोलिसांचे (Police) दोन पथक देखील बुलडाण्यात दाखल झाले. प्रशासनाकडून या अपघातात मृत्यू झालेल्या वर्धा येथील मृतांच्या नातेवाईकांशीही संपर्क साधला जात आहे.

बहुतेक नातेवाईकांच्या सहमतीने सामूहिक अंत्यसंस्काराचा निर्णय घेण्यात आला. 'फॉरेन्सिक टीम' ने सलग २४ तास काम केले तरीही 'डीएनए' चा अहवाल यायला पाच दिवस लागतील. मात्र, जळालेले मृतदेह इतके दिवस ठेवता येणार नाही. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांच्या सहमतीने अंत्यसंस्काराचा निर्णय घेण्यात आला. रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन आहे.

Accident at Samruddhi Highway
Buldana Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावरचा ‘हा’ सर्वाधिक बळी घेणारा अपघात !

फॉरेन्सिक टीम' ने सलग २४ तास काम केले तरी 'डीएनए'चा अहवाल यायला पाच दिवस लागतील. मात्र, जळालेले मृतदेह इतके दिवस ठेवता येणार नाहीत. यामुळे मृतांच्या कुटुंबीयांच्या सहमतीने अंत्यसंस्काराचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन आहे. सर्व मृतदेह बुलडाणा जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. संध्याकाळपर्यंत २५ मृतांपैकी २० जणांचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात पोहचले आहेत. इतर नातेवाईकही रात्री उशीरापर्यंत पोहचणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com