Samruddhi Mahamarg Accident : ...म्हणून अपघातातील मृतांची ओळख पटवण्यात अडचण; 'ट्रॅव्हल एजंट'ही फरार

Accident at Samruddhi Mahamarg : ट्रॅव्हल एंजट आपल्या कार्यालयाचे शटर बंद करून फरार
Buldhana Bus Accident
Buldhana Bus AccidentSarkarnama
Published on
Updated on

Buldana Samruddhi Mahamarg Accident : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजानजीक समृद्धी महामार्गावर शनिवारी (ता. १ जुलै) रात्री दीड वाजताच्या सुमारास विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. (Samruddhi Mahamarg Accident)

अपघातात होरपळल्याने एकाही मृतदेहाची ओळख पटवता येत नाही. त्यामुळे आता 'डीएनए टेस्ट'नंतरच मृतांचा ओळख पटणार आहे. या तपासणीनंतरच मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करता येणार आहे. दरम्यान, ट्रॅव्हल एजंटच्या चुकीमुळेही तपासात अडचणी येत असल्याची माहिती समोर येत आहे. आता संबंधित ट्रॅव्हल एंजट आपल्या कार्यालयाचे शटर बंद करून फरार आहे. (Latest Marathi News)

Buldhana Bus Accident
BJP News : विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर भाजपा करणार एनडीएचे शक्तीप्रदर्शन...

नागपूर-पुणे एमएच २९ बीई १८१९ या खासगी बसला अपघात झाला आहे. ही बस ३० जून रोजी सायंकाळी पाच वाजता ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने रवाना झाली होती. ही बस कारंजा येथे जेवणासाठीही थांबली होती. त्यानंतर शनिवारी ता. १ जुलैच्या रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात प्रवाशांचे फोनसह सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

आता ट्रॅव्हल एजंटने केलेली मोठी चूक समोर आली आहे. त्यामुळे मृत प्रवाशांची ओळश पटवण्यात अडचण येत आहे. या बसमधील प्रवाशांना ट्रॅव्हल एजंटने केवळ नावाच्या आधारावर प्रवाशांना तिकिट दिले. प्रवाशांचे आडनाव नसल्याने मृतांची ओळख पटवण्यात अडचण येत असल्याचे आता समोर आले आहे. आता वर्ध्यातील बजाज चौकातील ट्रॅव्हल एजंटचे कार्यालयही बंद आहे. तर ट्रॅव्हल एजंट फरार आहे.

Buldhana Bus Accident
Sharad Pawar on Buldhana Bus Accident: पाच लाख रुपये देऊन प्रश्न मिटणार नाही..; शरद पवारांनी राज्य सरकारला फटकारले

मृत पावलेल्यांमध्ये नागपूरचे आयुष गाडगे, कौस्तुभ काळे, कैलास गंगावणे, इशांत गुप्ता, गुडीया शेख, तर वर्ध्याचे अवंती पोहनकर, संजीवनी गोटे (अल्लीपूर), प्रथमेश खोडे, श्रेया वंजारी, वृषाली वनकर, ओबी वनकर, शोभा वनकर यांचा समावेश आहे. ही माहिती आपत्ती बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com