New information in Sana Khan's murder case : भाजपच्या अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी सना खान यांच्या खून प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. पप्पू ऊर्फ अमित शाहू आणि त्याची गॅंग सनाच्या माध्यमातून लोकांचे अवघडलेल्या स्थितीतील छायाचित्र मिळवायचे आणि त्यानंतर त्यांच्याकडून पैशांची मागणी करायचे. नागपूरच्या सीताबर्डीतील एका व्यापाऱ्याने लाखो रुपये या गँगला दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. (The police informed that lakhs of rupees were given to this gang)
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रकारात नेमके कोणाला ओढायचे हे पप्पू त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती पाहून ठरवत असे. त्यानंतर सनाच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीसोबतचे अवघडलेल्या स्थितीतील छायाचित्र मिळाल्यानंतर साहू व त्याच्या गँगमधील सदस्य पीडित व्यक्तीला फोन करून पैशाची मागणी करत असत.
सना खान यांच्या माध्यमातून पप्पू ऊर्फ अमित शाहू हा ‘सेक्सटोर्शनचे रॅकेट’ चालवीत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्याने या माध्यमातून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील मोठ्या लोकांची कोट्यवधींनी लुबाडणूक केली असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
सना खान आणि पप्पू शाहू यांची चार वर्षांपूर्वी फेसबुकवरून ओळख झाली. यानंतर वाराणसीला जात असताना, त्याने सना खान यांना जबलपूर येथून बिर्याणीचा डबा दिला होता. तेव्हापासून त्याची आणि सना खान यांची पक्की मैत्री झाली आणि त्यानंतर प्रेमात रूपांतर झाले. यानंतर जबलपूरनजीकच्या कटंगी येथे आशीर्वाद ढाबा सुरू करण्यासाठी सना खान यांनी पप्पू शाहूशी व्यावसायिक भागीदारी सुरू केली.
सना आणि पप्पू एकमेकांच्या खूप जवळ आले. त्यातून एप्रिल महिन्यात दोघेही विवाहबंधनात अडकले. यानंतर पप्पू शाहू याला सना हिचे अनेकांसोबत व्हिडिओ असल्याची माहिती मिळाली. त्याने ते व्हिडिओ आणि फोटो आपल्याकडे ठेवले. या व्हिडिओंमध्ये नागपूरसह (Nagpur) उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) आणि मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) काही राजकीय पदाधिकारी आणि बड्या आसामींचा समावेश असल्याचे त्याला दिसून आले.
पप्पूने सना खानच्या या व्हिडिओंचा वापर करीत, त्यांच्याकडून पैशाची मागणी करण्यासाठी दबाव टाकला. त्यातून सना खान यांनी अनेकांची कोट्यवधींनी लुबाडणूक केली. सना खान या गॅंगशी मार्च २०२१ मध्ये जुळल्या गेली होती. या रॅकेटच्या माध्यमातून शाहूने मोठी संपत्ती जमवली होती.
दरम्यान या संपत्तीतील पैसे सातत्याने सना खान मागत असल्याने तिला कायमचे संपविण्याच्या उद्देशातून त्याने तिचा खून केला. या प्रकरणात शाहू याच्या विरुद्ध ३८४, ३८६, ३८९, ३५४ (ड), १२० (ब) आणि ३४ कलमाअंतर्गत व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६ (इ), ६७, ६७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.