Sana Khan Murder Case : आणखी एकाला अटक, मोबाईलमध्ये नागपुरातील बड्या असामींचे 'व्हिडिओज'?

Crime Squad Nagpur : कमलेश पटेलला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
Sana Khan
Sana KhanNagpur

Nagpur Office bearers of BJP Minority Cell Sana Khan News : भाजप अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी असलेल्या सना खान खून प्रकरणी दररोज नवनवे खुलासे होत आहेत. अमित ऊर्फ पप्पू शाहूची गॅंग ‘सेक्सटॉर्शन’ करत होते. सनाचा खून केल्यानंतर विल्हेवाट लावलेल्या दोन मोबाईल फोन्समध्ये नागपुरातील बड्या असामींच्या चित्रफीत असल्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (The search for two more mobile phones is on)

शनिवारी (ता. १९) अटक केलेल्या धर्मेंद्र सिंग याचा साथीदार कमलेश पटेलला गुन्हे शाखेच्या पथकाने काल (ता. २१) अटक केली. त्याच्याकडून एक मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून अजून दोन मोबाईलचा शोध सुरू आहे. याच दोन मोबाईलमध्ये ‘त्या’ चित्रफिती असल्याचे सांगण्यात येत आहे.

सना खानचा जबलपूरमध्ये तीन ऑगस्टला अमित ऊर्फ पप्पू शाहू याने खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली. याशिवाय त्याचा साथीदार धर्मेद्र सिंग याला सना खान यांचे साहित्य आणि मोबाईलची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पप्पूने दिली. धर्मेंद्रने सना यांची कपड्यांची बॅग आणि इतर साहित्य जबलपूर येथे ५० किलोमीटर अंतरावर फेकून दिले.

सना यांच्या तीन मोबाईलची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्याचा साथीदार कमलेश पटेल याला दिली. त्याने एक मोबाईल परिसरातील झाडात फेकून दिला. चौकशीदरम्यान ही बाब समोर आल्यावर पथकाने कमलेशला अटक केली. त्याच्याकडून एक मोबाईल जप्त केला. मात्र, उर्वरित दोन मोबाईल त्याने नदीत फेकल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना त्याच्यावर विश्‍वास नसल्याने त्या दोन मोबाईलचा शोध सुरू केला आहे.

Sana Khan
Nagpur RingRoad News: रिंगरोडसाठी नकाशात भौगोलिक स्थानबदल करून फसवल्याचा आरोप, शेतकरी करणार आंदोलन !

दरम्यान पप्पू शाहूच्या दबावात सना यांनी मध्यप्रदेश, (Madhya Pradesh) उत्तरप्रदेशसह महाराष्ट्रातील अनेकांची ‘सेक्सटॉर्शन’च्या नावावर कोट्यवधी रुपयांनी लुबाडणूक केली. त्यामुळे या दोन्ही मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणात चित्रफीत असल्याची शंका पोलिसांना आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

ते मोबाईल हाती लागताच, नागपुरातील (Nagpur) बड्या असामींची नावे समोर येण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, नागपूरच्या एका बड्या व्यापाऱ्याला अशाच प्रकारे लुबाडण्यात आल्याचेही समोर आले आहे. सध्या या प्रकरणात चार आरोपींना अटक केली असून चौघेही पोलिस कोठडीत आहेत. आज (ता. २२) त्यांची पोलिस कोठडी संप आहे.

Sana Khan
Nagpur District News : चार मिनिटांत संपविल्या मुलाखती, अन् बाहेरगावच्यांना पोलिस पाटील म्हणून निवडले !

जबलपूरमधील सर्व अज्ञात मृतदेहांची तपासणी करणार..

पोलिसांना (Police) अद्यापही सना खान यांचा मृतदेह हाती लागलेला नाही. यापूर्वी जबलपूरपासून तीनशे किलोमीटर अंतरावरील एका गावात विहिरीत सापडलेल्या मृतदेहाबाबत खुलासा झालेला नाही. त्यामुळे सना खान यांच्या मृतदेह तपासण्यासाठी पोलिसांनी जबलपूरमधील सर्व अज्ञात मृतदेहांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत पथकाला आदेशही दिले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com