Sana Khan Death Case: ‘सेटलमेंट’च्या तगाद्याने वैतागला होता पप्पू, म्हणून...

Missing BJP Leader Case: १५ लाखांत सेटलमेंट करण्याची तयारी सना यांनी केली होती.
Sana Khan
Sana KhanSarkarnama
Published on
Updated on

Sana demanded a settlement of 15 lakhs : बहुचर्चित सना खान खून प्रकरणातील अमित ऊर्फ पप्पू शाहू आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी सना खान यांची लॉकडाऊनदरम्यान फेसबुकवर ओळख झाली होती. दरम्यान त्यानंतर ते २०२१ साली मे महिन्यात एकमेकांना भेटले. त्यांच्यात खटके उडाल्यानंतर १५ लाखांत सेटलमेंट करण्याची तयारी सना यांनी केली होती. (It was introduced on Facebook during the lockdown)

पप्पूला दिलेले पैसे आणि सोनसाखळी परत देत १५ लाखांत सेटलमेंट करण्याची मागणी सना यांनी केली होती. अमितला पैशाची मागणी केल्यावर त्यांची भांडणे व्हायची. २ ऑगस्टला त्या जबलपूरला अमितच्या घरी गेल्यावर त्याने सना यांची हत्या केली. अमितने मित्र राजेश सिंगच्या मदतीने रात्री सना यांचा मृतदेह हिरण नदीतील धरणात फेकला.

फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर अमितने त्याचा जबलपूर येथील कटंगी मार्गावर आशीर्वाद ढाबा असल्याचे सना यांना सांगितले होते. त्यानंतर दोघांनीही इतर ठिकाणी ढाबा सुरू करण्यासाठी भागीदारी सुरू केली होती. कटंगी येथे आशीर्वाद ढाबा सुरू करण्यासाठी सना ऊर्फ हिना खान यांनी अमित ऊर्फ पप्पू शाहू याच्याशी व्यावसायिक भागीदारी सुरू असतानाच पाच लाख रुपये व दोन लाखांचे दागिने दिले होते.

त्यानंतर एप्रिल महिन्यात त्याच्याशी लग्न केले. मात्र, त्यानंतर काही दिवसाच त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी (Criminal records) सना यांना कळली. त्यामुळे त्यांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. सना खान यांना अमित ऊर्फ पप्पू शाहू याची पार्श्‍वभूमी माहिती झाल्यावर त्यांनी भागीदारी आणि दिलेले सोने आणि पैसे परत देण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळे पप्पूने वैतागून सना यांचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पप्पूने एप्रिल महिन्यात सना यांचेशी लग्न केले होते.

Sana Khan
Nagpur BJP News : कार्यालये बंद करून आराम करणाऱ्या माजी नगरसेवकांना भाजपने फटकारले, दिला ‘हा’ इशारा !

तपासासाठी पप्पूला जबलपूरला नेणार..

नागपूर (Nagpur) पोलिसांनी अमित ऊर्फ पप्पू शाहूला जबलपूरला अटक केल्यावर त्याला शनिवारी (ता.१२) पहाटे नागपुरात आणले. त्याची १८ तारखेपर्यंतची कोठडी मिळवीत, तपासास सुरुवात केली आहे. दरम्यान पप्पूने हे नेमके कसे काय केले? याचा तपासणीसाठी पोलिस (Police) त्याला जबलपूरला नेणार असल्याची माहिती आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com