Sanjay Gaikwad News : 'तुपकर... तुझी 'शिकार' नक्की करणार; शिंदेंचे आमदार गायकवाडांचा इशारा!

Lok Sabha Election 2024 : माझ्या शिकारीची गोष्ट वेगळी परंतु आता तुझी शिकार नक्कीच करणार, असा इशारा दिला.
Sanjay Gaikwad News
Sanjay Gaikwad NewsSarkarnama

Buldhana News : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदरसंघांच्या मतदानाला अवघे काही तास उरले असताना आणि प्रत्यक्ष प्रचार बंद झाला असताना, बुलडाण्यातील राजकीय वातावरण सोशल मीडिया वॉरमुळे चांगलेच तापले आहे. यामुळे प्रत्यक्ष प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्यातरी सोशल वॉर सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. (Latest Marathi News)

शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी शेगावच्या सभेत केलेल्या टीकेवर सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्हिडिओद्वारे आमदार गायकवाड यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे तुपकर यांच्या थेट शिकारीची भाषा केल्याने संपूर्ण वातावरण तापले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मिळालेल्या माहितीनुसार प्रचार संपायला दहा मिनिटे उरलेले असताना अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी शेगाव येथील सभेत आमदार संजय गायकवाड यांच्यावर सडकून टीका केली होती. आमदार गायकवाड यांनी एका महिलेची जमीन बळकावल्याचा उल्लेखही त्यांनी यामध्ये केला होता.

Sanjay Gaikwad News
Congress Vs BJP : लोकसभा आली अन् काँग्रेसचे 'हे' दिग्गज नेते भाजपात दाखल
Sanjay Gaikwad News
Sharad Pawar NCP Manifesto 2024: स्पर्धा परीक्षांची फी माफ करणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'गॅरंटी'

असे गंभीर आरोप केल्यानंतर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनीही (Sanjay Gaikwad) पलटवार केला. त्यांनीही मग आपला एक व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर अपलोड केला. यामध्ये त्यांनी तुपकर यांना 'तोडी कर' असे संबोधून माझ्या शिकारीची गोष्ट वेगळी, परंतु आता तुझी शिकार नक्कीच करणार, असा इशारा दिला. यासह तुपकरांनी केलेल्या आरोपांना उत्तरे दिली. त्यामुळे प्रचार तोफा थंडावल्यानंतरही बुलडाण्यातील वातावरण मात्र चांगलेच तापले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com