Sanjay Gaykwad News : आमदार संजय गायकवाड पुन्हा अडकणार? शेती बळकावल्याचा महिलेचा आरोप !

Buldhana Crime : सदर जमिनीवर फार्म हाऊस बांधल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Sanjay Gaikwad
Sanjay Gaikwad Sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Gaykwad News : वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यात बांधला आहे, असे वक्तव्य केल्यानंतर अडचणीत सापडलेले बुलडाण्यातील एकनाथ शिंदे - शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांवर आता एकापाठोपाठ एक संकटे उभी ठाकली आहेत. शेतजमीन हडपून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली आता न्यायालयाने आमदार गायकवाडांसह मृत्युंजय गायकवाड आणि आणखी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.

आपण देत असलेल्या भावात शेतजमीन आपल्या नावावर करून द्यावी लागेल, असा तगादा आणि सदर जमिनीवर फार्म हाऊस बांधल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिटा यमुनाप्रसाद उपाध्याय राहणार नागपूर, असे या तक्रारकर्त्या महिलेचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील राजूर गावात त्यांची दीड एकर शेती आहे. आमदार गायकवाड यांनी २१ जुलै २०२१ला त्यांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण केले.

उपाध्याय यांच्या शेतजमिनीवरची कुंपणे त्यांनी काढून फेकली. तेथे त्यांनी अवैधरीत्या फार्म हाऊस बांधले. त्यांच्या शेतजमिनीत उत्खनन केले. त्यातून मुरूम काढला. याचिकाकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला, तेव्हा त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. तसेच ही शेतजमीन कवडीमोल भावाला विकण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला. तसं न केल्यास आपल्याला जिवे मारण्याची धमकी गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्याचा आरोप सुरुवातीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Gaikwad
MLA Sanjay Gaikwad : वाघाची शिकार केली, दात गळ्यात घातला; शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड अडचणीत

अॅड. इशान सहस्रबुद्धे आणि ॲड. एस. डी. दातार यांच्यामार्फत उपाध्याय यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) कडे वर्ग करावा, अशी विनंती केली. न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठाने बोरखेडी पोलिसांना नोटीसही बजावली आहे. सध्या सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

तक्रारकर्त्या महिलेने आमदार संजय गायकवाड यांच्यासह काही जणांविरोधात १२ ऑगस्ट २०२१ रोजी बोरखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. त्यांनी पोलिसांसह राज्य शासनाकडे ऑनलाइन तक्रारही केली. मात्र, उपयोग झाला नसल्याने न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी मोताळा न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. यामध्ये न्यायालयाने प्रकरणाची बाजू तपासून फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 च्या अनु.156 (3) नुसार कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. कलम 143, 150, 379, 385, 447 आणि 34 अन्वये कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी एस.पी. पांडव यांनी दिले आहेत.

मागील 4 वर्षांपासून सदर प्रकरण जिल्ह्यात गाजत आहे. यावर आमदार संजय गायकवाड यांनी यापूर्वीही प्रतिक्रिया नोंदविली होती. त्यांच्यानुसार आपण कुठल्याही जागेवर अतिक्रमण केलेले नाही आणि महिलेने आपल्यावर केलेले सर्व आरोप धादांत खोटे असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. असे असले तरी आता न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी (ता. 26) सायंकाळपर्यंत यामध्ये गुन्हा दाखल झालेला नव्हता.

मोताळा न्यायालयाकडून गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला 8 दिवसांचा अवधी ओलांडला तरी अद्यापपर्यंत पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला नाही आणि या संदर्भात मी जेव्हा जेव्हा पोलिसांशी संपर्क केला, तेव्हा तेव्हा बंदोबस्ताची खूप गडबड आहे वेळ लागेल, अशी उत्तरं दिले गेल्याचा आरोप याचिकाकर्त्या रिटा उपाध्याय यांनी केला आहे.

Edited By : Atul Mehere

R

Sanjay Gaikwad
MLA Sanjay Gaikwad यांच्या गळ्यातील वाघाचा दात आला त्यांच्याच गळ्याशी; गुन्हा दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com