Sanjay Kute : संजय कुटे ठरले 'किंगमेकर'; प्रतापराव जाधवांच्या विजयासाठी अशी राबवली रणनीती

Prataprao Jadhav Vs Narendra Khedkar : प्रतापराव जाधवांना 3 लाख 49 हजार 867 तर खेडेकरांना 3 लाख 20 हजार 388 मते मते मिळाली आहेत. तर अपक्ष रवींद्र तुपकरांनी 249963 मते घेतली.
Sanjay Kute, Prataprao Jadhav
Sanjay Kute, Prataprao JadhavSarkarnama
Published on
Updated on

पंजाबराव ठाकरे

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव चौथ्यांदा खासदार झाले. यावेळी मात्र त्यांना विजयसाठी ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी चांगलेच झुंजवले. तीन वेळा खासदार असलेल्या जाधवांचा यावेळी 29 हजार 479 मतांनी निसटता विजय झाला आहे. जाधवांच्या या विजयात आमदार संजय कुटे यांनी महत्त्वाची भूमिका निभावल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

प्रतापराव जाधवांना 3 लाख 49 हजार 867 तर खेडेकरांना 3 लाख 20 हजार 388 मते मते मिळाली आहेत. तर अपक्ष रवींद्र तुपकरांनी 2 लाख 49 हजार 963 मते घेतली. या जाधवांच्या विजयात जळगाव जामोद व खामगाव या दोन मतदारसंघांनी भरभक्कम साथ दिली. आमदार कुटे यांनी पुन्हा एकदा किंगमेकरचा भूमिका घेत प्रतापरावांच्या विजयात मोलाचा वाटा उचलल्याचे दिसून येत आहे.

भाजपने कुटेंवर बुलडाणा मतदारसंघातून शिंदे गटाच्या जाधवांना विजयी करण्याची जबाबदारी होती. मात्र ठाकरेंच्या खेडेकरांपुढे ही लढाई सोपी नाही, हे त्यानी आधीच जाणले होते. त्यातून त्यांनी एकएक मत जुळवण्यासाठी रात्रंदिवस यंत्रणा कामाला लावली होती. जाधव ज्या घाटावरून येतात त्याच भागातील मतदारसंघांमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळालेले नाही. मात्र घाटाखालील खामगाव, जळगाव जामोद मतदारसंघातून त्यांना भक्कम साथ मिळाली.

आमदार कुटेंनी सांगितल्याप्रमाणे जळगाव जामोद मतदारसंघातून मोठे लिड दिले. पक्षसंघटन कामाला लावले. पक्ष संघटनेतील प्रत्येकाला जबाबदारी दिल्या. बुथस्तरापर्यंत कामाचे विभाजन करून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणले. यातून जळगाव जामोद मतदारसंघाने जाधवांना 75 हजारांवर मते दिली. तेवढेच मताधिक्य खामगावातूनही मिळवून दिले. या दोन मतदारसंघांनी सुमारे दीड लाखांवर मताधिक्य जाधवांना दिले.

Sanjay Kute, Prataprao Jadhav
Navneet Rana : नवनीत राणांचा पराभव भाजपच्या जिव्हारी; लोकसभेच्या निकालानंतर पहिला राजीनामा...

जाधव यांना मिळालेल्या सुमारे साडेतीन लाख मतांमध्ये दीड लाख याच दोन मतदारसंघातील आहेत. उर्वरीत दोन लाख मते घाटावरील आहेत. ही मते त्यांच्या पारड्यात टाकण्यासाठी आमदार कुटे यांच्या नेतृत्वात अहोरात्र काम झाले. त्याचे फळ निकालातून मिळाले. आमदार कुटे यांचे भाजपमध्ये सातत्याने वजन वाढत आहे. बुलडाण्याची मित्र पक्षाची जागा जिंकून आणत त्यांनी आणखी एक यश मिळवले. पक्ष नेतृत्वाला त्यांच्या कामाची दखल घ्यावीच लागेल, असेही आता बालेले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sanjay Kute, Prataprao Jadhav
Nitin Gadkari Vs Vikas Thackeray : नितीन गडकरींचा पराभव अशक्य नाही; विकास ठाकरेंचा कॉन्फिडन्स...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com