PM Modi Yavatmal Visit : भावना गवळी म्हणाल्या माझं तिकीट फायनल, तर संजय राठोड म्हणतात...

Sanjay Rathod : पक्षाच्या आदेशानुसार दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
PM Modi Yavatmal Visit : भावना गवळी म्हणाल्या माझं तिकीट फायनल, तर संजय राठोड म्हणतात...
Published on
Updated on

Sanjay Rathod News : पंतप्रधान नरेंद्र मोदी अवघ्या दोन तासांत यवतमाळला पोहोचणार आहेत. केंद्रीय मंत्र्यांसह, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची मांदियाळी आज तेथे आहे. अशात शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या खासदार भावना गवळी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लोकसभेसाठी माझं तिकीट फायनल आहे, आता त्यावर बोलण्यासारखं काही नाही, असे त्या म्हणाल्या.

यावर राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पक्ष ज्याला तिकीट देईल, त्याचे काम करू. पक्षाच्या आदेशानुसार दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पण दुसरीकडे संजय राठोड सध्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी करीत असल्याचे सांगण्यात येते. यासाठी दारव्हा-दिग्रस विधानसभा मतदारसंघातून त्यांनी मुलीला लढवण्याची तयारी केली असल्याचीही माहिती आहे.

मुलगी दामिनी यांचे जोरदार लॉंचिंग त्यांनी केले होते. नेत्यांच्या मुलांनी राजकारणात पदार्पण करण्याची प्रथा संजय राठोड यांच्या पुढील पिढीनेही कायम राखली आहे. दामिनी राठोड यांची शिवसेना युवा सेनेत (शिंदे गट) राज्य कार्यकारिणीवर निवड झाली आहे. पक्षाने युवासेनेच्या (युवती) निरीक्षक म्हणून दामिनी यांच्यावर जबाबदारी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

PM Modi Yavatmal Visit : भावना गवळी म्हणाल्या माझं तिकीट फायनल, तर संजय राठोड म्हणतात...
#Short : यवतमाळमध्ये PM मोदींच्या सभेत राहुल गांधींचे फोटो | Yavatmal | PM Modi |

आज (ता. 28) माध्यमांशी बोलताना राठोड म्हणाले की, शिवसेना शिंदे गटाला २२ जागा द्याव्या, यावर सकारात्मक चर्चा सुरू आहे. ते म्हणाले, शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करत आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. आजच्या मेळाव्यानंतर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर सकारात्मक संदेश जाणार आहे. आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा यवतमाळ जिल्ह्यात येत आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण होत आहे.

येणारा काळ महिलांचा..

पंतप्रधानांचं व्यक्तिमत्त्व आगळं वेगळं आहेत. त्यामुळे आज लाखो भगिनी मेळाव्याला येणार आहेत. पंतप्रधान मोदी जिल्ह्याला काय देतात, याकडे आमचं लक्ष आहे. येणार काळ हा महिलांचाच असेल. सरकार त्या दिशेने पावले टाकत आहे. देशातील 48 टक्के महिलांवर मोदी सरकार फोकस करून सरकार काम करत आहे. मोदी हे देशातील सर्व महिलांचे भाऊ आहेत, असे संजय राठोड म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य निवडून आणणे हे भाजपचे लक्ष्य आहे. त्यासाठी भाजपचे केंद्रस्तरीय नेत्यांचे दौरे आधीच सुरू झाले आहेत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. मोदींचा आजचा मेळावा हासुद्धा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन आयोजित केला असल्याचे सांगण्यात येत आहे. आजच्या संबोधनात मोदी काय काय नवीन घोषणा करतात, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

Edited By : Atul Mehere

PM Modi Yavatmal Visit : भावना गवळी म्हणाल्या माझं तिकीट फायनल, तर संजय राठोड म्हणतात...
PM Modi to Visit Yavatmal: असा आहे पंतप्रधान मोदींचा यवतमाळ दौरा; सहा प्रकल्पांचे लोकार्पण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com