Sanjay Rathod News : हजारोंसाठी दखलपात्र ठरली संजय राठोड यांची असंवेदनशीलता !

Washim : पालकमंत्री संजय राठोड यांनी येणे अपेक्षित होते, तसा प्रघातही आहे.
Sanjay Rathod
Sanjay RathodSarkarnama

अरुणाचल प्रदेशातील कमेंग व्हॅली येथे चीन सीमेवर देशाचे रक्षण करताना १७ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजता वाशीम तालुक्यातील सोनखास येथील भारतीय सैन्यातील जवान अमोल गोरे याला वीरमरण आले. जिल्ह्यातील जवान शहीद झाल्यावर त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी येणे अपेक्षित होते, तसा प्रघातही आहे. पण त्यांनी अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवल्याने हजारो लोकांचा रोष ओढवून घेतला आहे.

अमोल गोरे आणि त्यांचे दोन सहकारी जवान चीन सीमेवर गस्तीवर असताना कमेंग व्हॅली येथे मुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहत होते. यादरम्यान पाण्याचा मोठा प्रवाह त्यांच्या दिशेने आला. या प्रवाहात अमोल व त्याचे दोन सहकारी जवान वाहून जात होते. अमोलने आपल्या जिवाची पर्वा न करता त्या दोघांना पाण्याच्या प्रवाहातून वाचवले. या प्रयत्नात अमोलच्या डोक्याला पाण्याच्या प्रवाहातील एक मोठा दगड लागला आणि यातच अमोल शहीद झाला.

गावाजवळच असलेल्या शहीद अमोलच्या शेतात सायंकाळी ५.२० वाजता शासकीय लष्करी इतमामात त्याच्‍या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. शहीद अमोलचा चार वर्षाचा मुलगा मयूर याने शहीद अमोलला मुखाग्नी दिला. अंतिम संस्कार प्रसंगी सर्वप्रथम शहीद अमोलचे वडील तान्हाजी गोरे, आई मंदाबाई, पत्नी वैशाली गोरे, मुले मयूर व तेजस, भाऊ हनुमान गोरे, विवाहित बहीण उमेश भिसडे यांनी पुष्पचक्र वाहिली.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने सहायक जिल्हाधिकारी (Collector) श्रीमती मिन्नू पी.एम. यांनी शहीद अमोलच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिली. पॅरा युनिटचे मेजर सुबोध राठोड, मेजर अजयसिंग, भारतीय सैन्याच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच जिल्ह्यातील अनेक गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहीद अमोलला मुलगा मयूर मुखाग्नी देत असताना वातावरण शोकाकूल झाले होते.

Sanjay Rathod
Sanjay Rathod News : राठोड गिरवत आहेत भूमरेंचाच कित्ता, अधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांचीही पायपीट !

वाशीम (Washim) जिल्ह्याचा सुपुत्र सीमेवर शहीद झाला. मात्र त्याच्या अंत्यसंस्काराला पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) वाशीम जिल्ह्याकडे फिरकलेच नाही. त्यामुळे हजारो नागरिकांनी रोष व्यक्त केला. जिल्ह्याचा एक सुपुत्र देशाची सीमा राखताना शहीद होत असेल आणि त्याच्या अंत्यसंस्काराला पालकमंत्र्यांना वेळ मिळत नसेल तर तो व्यक्ती संवेदनाहीन आहे. संजय राठोड यांची ही राजकीय (Political) असंवेदनशीलता हजारो लोकांसाठी दखलपात्र ठरली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com