Sanjay Shirsat - ..अन् संजय शिरसाट जाहीरपणे म्हणाले, ''नागपूरचे लोक कोकणातील हापूस आंब्यापेक्षाही गोड''

Sanjay Shirsat’s Address at Nagpur Event - सरन्यायाधीश गवई यांची गडकरी, फडणवीस अन् बावनकुळेंसोबत नेमकी काय सुरू होती चर्चा, हे देखील मंत्री शिरसाट यांनी सांगितले आहे.
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Shirsat praises Nagpur citizens - एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट नेहमीच आक्रमक भूमिकेत असतात. प्रसंगी महायुतीमधील नेत्यांनाही ते शिंगावर घेण्यास ते मागेपुढे बघत नाही. निधी वाटपावरून त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट तोफ डागली होती. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांचा राग असावा असेच त्यांचे वागणे बोलणे असते.

मात्र आज नागपूरमध्ये त्यांचे वेगळेच रुप बघायला मिळाले. विदर्भातील नेत्यांचा ऐकोपा, जिव्हाळा आणि खेळीमेळीचे संबंध बघून ते चांगलेच भारावल्याचे दिसले. त्यामुळे मलाच येथे संकोच वाटत असल्याचे सांगून त्यांनी नागपूरचे लोक कोकणातील हापूस आंब्यापेक्षाही गोड असल्याची भावना व्यक्त केली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या परिसरात संविधान प्रस्तावना पार्कचे उद्‍घाटन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Sanjay Shirsat
Chief Justice Bhushan Gavai - मुख्यमंत्र्यांचा आदेश अन् सरन्यायाधीशांच्या स्वागताला झाडून सगळे अधिकारी विमानतळावर हजर!

तर सामाजिक न्यायमंत्री म्हणून संजय शिरसाट यांनाही निमंत्रित केले होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, सरन्याधीशांच्या प्रोटोकॉलमुळे कार्यक्रमाला यायचे की नाही या विचारात होतो, पण भीतभीतच आलो. येण्यापूर्वी येऊ की नाही म्हणून एका अधिकाऱ्याला फोन केला. त्याने कार्यक्रम ११ वाजताचा आहे आणि तुम्हाला वेळेवरच उपस्थित राहण्यास सांगितले आहे. लगचे मी त्याला मला मंचावर बसायचे आहे की प्रेक्षकांमध्ये हेही विचारून टाकले. त्याने आपण या एवढेच उत्तर दिले. प्रोटोकॉलच्या भीतीने अर्धातास आधीच पोहचले. आल्यावर मला एका खोलीत बसवण्यात आले.

येथे मला नागपूरकर कसे असतात हे बघायला मिळाले. सरन्यायाधीश, गडकरी, बावनकुळे सर्वजण हसतखेळत गप्पा मारत होते. सरन्यायाधीश सर्वांसोबत एकेरी भाषेत बोलत होते. हे बघून मला आश्चर्य वाटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतर सर्वांच्या बोलण्यात आणखीच मोकळपेणा आला. त्यांनी मी या वर्गात बसत होते, तो माझ्या मित्र आहे. असे सरन्यायाधीश आणि नेत्यांचे संभाषण सुरू होते.

Sanjay Shirsat
Chandrapur District Bank Election - चंद्रपूर जिल्हा बँक निवडणुकीतील संघर्ष टळला; धानोरकर बिनविरोध, तर वडेट्टीवारांची माघार!

सरन्यायाधीश आणि विदर्भातील नेते एवढे गप्पात रंगले होते की मी या गावचाच नाही असे समजून कोणी माझ्याकडे बघतच नव्हते. आत्ताच कोणीतरी सांगितले प्रस्तावना पार्कसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी अडीच कोटींचा निधी मिळवून दिला. अहो तो माझ्याच सामाजिक न्याय खात्यातून देण्यात आला ते माझेच होते असे शिरसाट यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. मात्र यातून कोणत्या गोष्टीचे श्रेय कसे घ्यायचे हे मी शिकलो. विदर्भाची लॉबी कशी काम करते हेसुद्धा बघायला मिळाले. आजवर मी नागपूरला संत्र्यांचे शहर समजायचो मात्र येथील लोक कोकणातील हापूस आंब्यापेक्षाही गोड आहेत, असं संजय शिरसाट यांना यावेळी बोलून दाखवलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com