Saoner APMC : सभापती निवडीतून दाखवले वर्चस्व, सहकारात सुनील केदारांचा दबदबा कायम !

Sunil Kedar : सावनेरमध्ये बाजार समितीवर एकहाती सत्ता मिळवली.
Saoner APMC
Saoner APMCSarkarnama

Nagpur District's Saoner APMC News : नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा विजय मिळवून कॉंग्रेस नेते आमदार सुनील केदार यांनी विजयाची घोडदौड सुरू केली. त्यानंतर अध्यक्ष - उपाध्यक्षपदाची निवडणूक, नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूर पदवीधर मतदारसंघ, नागपूर शिक्षक मतदारसंघावर विजय मिळवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. (He played the lion's share in winning)

नागपुरात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचे यशस्वी आयोजनही करून दाखवले. त्यांचा मतदारसंघ असलेल्या सावनेरमध्ये बाजार समितीवर एकहाती सत्ता मिळवली. येथे सभापतीपदासाठी रवींद्र चिखले तर उपसभापती पदासाठी डॉ. प्रकाश लांजेवार बिनविरोध निवडून आले आहेत. या बिनविरोध निवडीच्या वर्चस्वातून आमदार सुनील केदार यांनी पुन्हा एकदा सहकार क्षेत्रात आपला दबदबा कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

यापूर्वी बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी पार पडलेल्या निवडणुकीत आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या मर्जीतील सर्व संचालक बिनविरोध निवडून आले होते. बाजार समितीच्या सभागृहात शुक्रवारी (ता. १२) दुपारी पार पडलेल्या सभापती व उपसभापती पदासाठी फक्त रवींद्र चिखले यांचा सभापती पदासाठी व डॉ.प्रकाश लांजेवार यांचेच उपसभापती पदासाठी नाम निर्देशन पत्र दाखल करण्यात आले.

यावेळी निवडणूक (Election) निर्णय अधिकारी म्हणून जयंत पालटकर उपस्थित होते. यावेळी दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. जिल्हा परिषद (ZP) अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, माजी जि.प. सदस्य बैद्यनाथ डोंगरे, माजी जि.प. उपाध्यक्ष शेषराव रहाटे, पं.स.सभापती अरुणा शिंदे, उपसभापती राहुल तिवारी, जि.प.सदस्य ज्योती शिरसकर प्रकाश खापरे यांची यावेळी उपस्थिती होती.

Saoner APMC
Nagpur Refinery : पेट्रोकेमिकल रिफायनरीला बारसूत विरोध, पण नागपुरात होण्याची शक्यता !

सर्व नवनिर्वाचित संचालक सुरज नवले, मयूर जिचकार, चंद्रशेखर कुंभलकर, देवाजी मुलमुले, सुभाष रहाटे, सुरेश केने, काशिराम पटे, वैभवी पाटील, मनोरमा चोपडे, अशोक डवरे, दुर्वास लाखे, गुणवंत काळे, प्रवीण झाडे, विनोद जैन, जगदीश ठाकरे, श्रावण दुरगवार, गोविंद ठाकरे, प्रकाश पराते, गणेश काकडे, नीलिमाताई उईके, ममता केसरे, पुष्पा करडमारे, लेकुरवाळे, गुणवंत चौधरी, जानराव केदार, शालिकराम घोरमारे, सतीश केदार, चंदू बनसिंगे,कांताराम भोयर, अनिल राय, अजय केदार, जिजाबाई बागडे, बबन भड, विवेक मोहाडे, मधुकर दुबाने, उदय महाजन, माधव महल्ले, दीपक सहारे, जीवन चौधरी, अरुण चिखले, आशिष उपासे, प्रफुल करणायके, रमेश हाडके उपस्थित होते.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com