Sanjay Kute: महिला सरपंचांचा अपमान करणाऱ्या आमदार कुटेंच्या विरोधात काँग्रेस आक्रमक

Swati Wakekar:विकासकामांच्या उद्धघाटनाला आमदारांची पत्नी येऊ शकते, पण सरपंचांना डावलले जाते.
Sanjay Kute News
Sanjay Kute News Sarkarnama
Published on
Updated on

Buldhana: भाजपचे आमदार संजय कुटे यांनी भर सभेत महिला सरपंचांचा अपमान केल्याचा प्रकार नुकताच विदर्भात घडला. या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आमदार कुटे यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. सामाजिक संघटना कुटेंच्या विरोधात आक्रमक झाल्या आहेत. काँग्रेसच्या प्रदेश सचिव स्वाती वाकेकर यांनी कुटेंना सुनावले आहे.

'आम्ही जातीपातीचं राजकारण करीत नाहीत, असे आमदार कुटे नेहमी सांगत असतात, पण त्यांच्या कृतीतून ते महिला सरपंचांचा अपमान करीत असतात. त्या गावाचा विकास करीत आहेत, पण त्यांना कार्यक्रमात बोलू दिले जात नाही. त्यांना आपलं म्हणणंसुद्धा मांडू देत नाहीत. हा अपमान एकट्या सरपंचताईंचा नाही, तो सगळ्या महिलांचा आहे. दोन-तीन वेळा कुटे यांनी त्यांचा अपमान केला आहे.

"विकासकामांच्या उद्धघाटनाला आमदारांची पत्नी येऊ शकते, पण सरपंचांना डावलले जाते, त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून असा अन्याय केला जातो का, अशी शंका निर्माण होते. अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचे काम कुणी करत असेल, तर त्यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही त्यांचा अपमान खपवून घेणार नाही," असे वाकेकर म्हणाल्या.

Sanjay Kute News
Pune Police News: अमितेश कुमारसाहेब, या गुंडगिरीला ठेचणार का? पुणेकरांचा विश्वास जिंकणार का...

जळगाव जामोद मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. यादरम्यान संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील एका पुलाचेही भूमिपूजन पार पडले. या वेळी जळगाव मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात सरपंच संगीता इंगळे यांना त्यांनी बोलू दिले नाही, असा आरोप इंगळे यांनी केला आहे.

महिला सरपंचांचा अवमान करणं भाजप आमदार संजय कुटे यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार संजय कुटे यांच्या विरोधात सरपंच प्रतिमा इंगळे यांनी तक्रार दाखल केली आहे .

बुलडाणा जिल्ह्यातील दलित संघटना, सरपंच संघटना तसेच अनेक सामाजिक संघटना एकवटल्या असून, आमदार कुटे यांचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. डॉ. संजय कुटे यांनी मी दलित असल्याने माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे, असे सरपंच इंगळे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com