Pune Police News: अमितेश कुमारसाहेब, या गुंडगिरीला ठेचणार का? पुणेकरांचा विश्वास जिंकणार का...

CP Amitesh kumar: राजकीय दबावामुळे पोलिसांची कारवाई पुढे सरकली नसल्याचेही दिसत आहे.
CP Amitesh kumar
CP Amitesh kumarSarkarnama

Pune: पुण्याचे पोलिस कमिशनर अमितेश कुमारांनी नामचीन गुंडांचा दरबार भरवून त्यांना हिशेबात राहण्याचा दमच दिला. अमितेश कुमारांच्या खाक्याने दहशतीचे साम्राज्य वाढविणाऱ्या टोळ्यांचे म्होरके वठणीवर येण्याची आशा असतानाच पर्वतीतील गुंडाने चक्क एका कुटुंबाच्या प्लॅटवर ताबा ठोकला आहे. त्याने केवळ ताबाच नाही; तर चक्क घरात घुसून या गुंडाने आपला संसारही थाटल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली; तरीही पोलिसांनाही न जुमणाऱ्या या गुंडाने मूळ घरमालकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पुढे आले आहे.

माजी नगरसेवकाच्या नातेवाइकानेच धाक दाखवून फ्लॅट बळकाविण्याचे उद्योग केल्याचे सांगण्यात येत आहे. गुन्हेगारी मोडीत काढून पुणेकरांना विश्‍वास देण्याचा प्रयत्न अमितेश कुमार करीत असतानाच ही घटना पुढे आली आहे. त्यामुळे घर मिळविण्यासाठी पोलिस आयुक्तालयापासून पोलिस ठाणे, चौकीत चकरा मारणाऱ्या या कुटुंबाला अमितेश कुमार हे न्याय देणार का, याकडे लक्ष आहे.

CP Amitesh kumar
Prakash Ambedkar News: कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आंबेडकरांची आज उलटतपासणी...

कर्ज काढून घेतलेला प्लॅट मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या लाडवा कुटुंबीयांनाच ‘मॅनेज’ करून तो विकण्यासाठी दबावही अन्य गुंडांकडून आणला जात आहे. त्यावरूनही लाडवा हे कुटुंबीय अडचणीत आले आहेत. मात्र, काही केल्या फ्लॅट सोडणार नसल्याचे सांगून संबंधित कुटुंबीय पोलिसांकडे धाव घेत आहे, पण राजकीय दबावामुळे पोलिसांची कारवाई पुढे सरकली नसल्याचेही दिसत आहे. त्यामुळे पोलिस कमिशनर अमितेश कुमार हे काही ठोस पावले उचलणार का, हे पाहावे लागणार आहे.

पर्वतीमधील (गाव) इंदिरा सदन या इमारतीत कांतीभाई लाडवा यांच्या मालकीचा फ्लॅट असून, काही महिन्यांपूर्वी एका गुंडाने फ्लॅटमालक लाडवा यांच्याकडून सह्या घेतल्या आणि फ्लॅटचा ‘टॅक्स’ लागू करण्यापासून अन्य कामे करण्याचा शब्द आहे. त्यावरून संबंधित फ्लॅट मालकाने काही कागदपत्रेही त्याच्याकडे दिली. त्यावरून गुंडाने कुलमुखत्यार पत्र तयार केले आणि थेट घरात राहू लागला. ही बाब कानावर येताच फ्लॅट मालकाने गुंडाला जाब विचारला; तेव्हा जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांना हाकलून दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हा वाद स्वारगेट पोलिसांपर्यंत गेला. तिथे तत्कालीन पोलिस निरीक्षकांना गुंडाला बोलावून फ्लॅटचे कुलमुखत्यार पत्र रद्द करण्यास सांगितले. त्यानंतर फ्लॅटही मालकाच्या ताब्यात देण्यास सांगितले. त्याला होकार देत ८ दिवसांत फ्लॅट मोकळा करणार असल्याचे सांगितले. मात्र, राजकीय नेत्यांची मदत घेऊन फ्लॅट सोडण्यास नकार दिला. त्यानंतर कुटुंबीय पोलिस ठाण्यात फेऱ्या मारल्या. त्यात काही अधिकाऱ्यांनी फ्लॅट मिळवून देण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या; मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे ते शक्य होत नसल्याने पोलिस कारवाईही थांबल्याचे स्पष्ट आहे.

ताबा घेणारा गुंड कोण

पर्वती भागातील एका माजी नगरसेवकाच्या पुतण्याची परिसरात दहशत आहे. तो आधी चुलत्याच्या नावाखाली गुंडगिरी करीत होता. आपले प्रस्थ वाढवल्याने तो आता स्वत:च्या बळावर लोकांना धमकावून ‘भाई’ म्हणून वावरत आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com