Satish Chaturvedi News : महाविकास आघाडीत पूर्व नागपूर शिवसेनेला मिळाला तर ज्युनिअर, नाहीतर सिनिअर चर्तुर्वेदी ?

Shivsena : पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात एकेकाळी शिवसेनेची चांगलीच ताकद होती.
Dushyant and Satish Chaturvedi
Dushyant and Satish ChaturvediSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Mahavikas Aghadi Politics News : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा यशस्वी झाल्यामुळे शिवसेनेला खुणावत असलेल्या पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात एकेकाळी शिवसेनेची चांगलीच ताकद होती. तेव्हा सेनेसोबत भाजप होती. आता राजकीय चित्र बदलले असून सोबतीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे. त्यामुळे विधानसभेत आघाडी झाल्यास हा मतदारसंघ मागायचा असे जवळपास उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे ठरले आहे. (Uddhav Balasaheb Thackeray has almost decided)

भाजप-सेनेची युती असताना तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार आणि ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांना दोनदा सेनेच्या उमेदवारांनी चांगलेच जेरीस आणले होते. शिवसेनेच्यावतीने प्रवीण बरडे यांनी चांगलीच मजल मारली होती. ते निवडून येण्याची शक्यता बळावली होती. मात्र जनता दलाच्या एका उमेदवारामुळे विभाजन झाले आणि चतुर्वेदी यांनी बाजी मारली. त्यानंतर चतुर्वेदी यांच्याच राजकारणाला कंटाळून शेखर सावरबांधे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

शेखर सावरबांधे शिवसेनेत दाखल झाले आणि पूर्व नागपूरचे उमेदवार म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आली. यावेळी अतिशय अटीतटीचा सामना झाला होता. सावरबांधे यांनी लाखाच्या घरात मते घेतली होती. मात्र बसपाच्या हत्तीने त्यांचा घात केला. भाजपचे तत्कालीन नगरसेवक अशोक गोयल यांनी बंडखोरी केली आणि बसपाच्या हत्तीवर निवडणूक लढवत जवळपास २० हजार मते घेतली.

सावरबांधे यांनी महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत गोयल यांच्या पराभवासाठी प्रयत्न केले होते. याचा राग गोयल यांच्या मनात होता. बसपाच्या हत्तीवर बसून आपला वचपा काढल्याचे गोयल यांचे म्हणणे होते. त्यानंतर भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडे मागून घेतला आणि दक्षिण नागपूर शिवसेनेसाठी सोडला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष असतानाही शेखर सावरबांधे यांना शेवटच्या क्षणी तिकीट नाकारण्यात आले. असे दोनदा घडल्याने सावरबांधे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. ते सध्या राष्ट्रवादीत आहेत.

Dushyant and Satish Chaturvedi
Mahavikas आघाडी ; Ajit Pawarही Nana Patole यांना वैतागले | Politics | Maharashtra | Sarkarnama

एकेकाळचे विरोधक चतुर्वेदी आणि सावरबांधे यांना महाविकास आघाडीमुळे (Mahavikas Aghadi) पुन्हा मांडीला मांडी लावून बसावे लागत आहे. शिवसैनिकांसोबतही त्यांना हस्तांदोलन करावे लागत आहे. या मतदारसंघात पदवीधर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांचासुद्धा डोळा आहे. ते यापूर्वी येथून विधानसभेची निवडणूक लढले आहेत. मात्र त्यावेळी काँग्रेसने त्यांना मनापासून साथ दिली नव्हती.

सतीश चतुर्वेदींनी पूर्व नागपूर (Nagpur) सोडून दक्षिणेत नशीब अजमावले. मात्र पराभव पदरी पडला. काँग्रेसमधील अंतर्गत भांडणे आणि निलंबनाच्या कारवाईमुळे ते विजनवासात गेले होते. आता ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. पूर्व नागपूर शिवसेनेला गेला तर ज्युनिअर म्हणजे दुष्यंत आणि काँग्रेसने नकार दिला तर सिनिअर म्हणजे सतीश चतुर्वेदी हेच उमेदवार राहणार असल्याचे बोलले जात आहे.

Dushyant and Satish Chaturvedi
Nagpur Assembly Constituency News: नागपूर पूर्वमध्ये भाजपला पराभूत करणे आघाडीसाठी अवघड नाही, पण...

एकंदरीतच काय तर कॉंग्रेस (Congress) किंवा शिवसेना (Shivsena) नागपूर पूर्व कुणालाही सुटला तरी आमदार मात्र चतुर्वेदींच्या घरचाच होणार, हे नक्की. पण दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ही बाब कितपत रुचणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com