Raju Sheety : बुलढाण्यात येऊनही रविकांत तुपकरांना का टाळले? चर्चांना उधाण

Ravikant Tupkar : राजू शेट्टी आणि तुपकरांमध्ये पुन्हा का वाढतोय दुरावा?
Raju Shettey in Buldhana.
Raju Shettey in Buldhana.Sarkarnama
Published on
Updated on

Buldhana News : शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन लढणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पुन्हा एकदा फूट पडण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांच्यात काही दिवसांपासून दुरावा वाढत असल्याचे काही घटनांवरून समोर आले आहे. नुकतेच राजू शेट्टी हे बुलढाणा दौऱ्यावर आले असताना त्यांनी रविकांत तुपकर यांची भेट टाळली.

शेट्टी यांनी ही भेट का टाळली, यावरून आता चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे रविकांत तुपकरांसाठी बुलढाणा लोकसभेची जागा सोडायची आणि दुसरीकडे शेट्टींनी तुपकरांना का टाळले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नेमके चाललेय तरी काय असा प्रश्न अनेकांना त्यामुळे पडला आहे.

Raju Shettey in Buldhana.
Buldhana : तुपकरांना अटक होताच बुलढाण्यात उमटले संतप्त पडसाद; रेल्वेरोकोचाही प्रयत्न

राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून सरकारच्या विरोधात तुपकरांनी एल्गार पुकारला आहे. इतक्या वेळा आंदोलने केली, मात्र या सर्व आंदोलनात कुठे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा फलक किंवा राजू शेट्टी यांचा नामोल्लेखही नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते.

तुपकरांनी स्वाभिमानी संघटनेशी फारकत घेतली का? हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला. या प्रश्नाचे उत्तर देताना रविकांत तुपकर यांनी मात्र सर्वकाही आलबेल असल्याचे त्यावेळी माध्यमातून सांगितले होते. असे असले तरी आंदोलनात स्वाभिमानी आणि शेट्टींना का टाळले हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. कधीही निवडणुकीचे बिगुल वाजू शकतो. यासाठी आता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो रे..’ची घोषणा करून राज्यातील बुलढाण्यासह सहा जागांवर लढणार असल्याचे जाहीर केले होते.

‘स्वाभिमानी’ने बुलढाणा लोकसभेची उमेदवारी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना जाहीरही करून टाकली होती. मात्र रविकांत तुपकरांनी एकप्रकारे आपण ‘स्वाभिमानी’तून लढणार नसल्याचे सांगितले. त्यांनी संघटनेचे बॅनरन वापरता वेगळा मार्ग पत्करला आहे. तुपकरांनी माध्यमातून प्रतिक्रिया देताना ‘राजू शेट्टी कोणासोबत तरी युती करतात आणि त्यात आमच्यासारख्यांचा बळी जातो’, असे विधान केले होते. रविकांत तुपकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली.

Raju Shettey in Buldhana.
Chandrapur : अख्ख्या गावाने केली पोलिस अधिकाऱ्यावर पुष्पवृष्टी, कारण...

राजू शेट्टींनी बोलताना तुपकर स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा विचारांवर चांगलेच असल्याचे म्हटले. याचे आम्ही स्वागतही करतो. पण, तुपकरांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. असे असताना बुलढाणा जिल्ह्यात राजू शेट्टी 19 जानेवारीला आले होते. 19 जानेवारीलाच तुपकरांचे आंदोलन सुरू होते. न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर ठरवून त्यांना जामीन दिला होता. त्याच दिवशी राजू शेट्टी हे बुलढाणा जिल्ह्यात पूर्णवेळ होते. मात्र तुपकर यांची भेट त्यांनी टाळली.

शेट्टी यांनी सोयाबीन-कापूसप्रश्नी आंदोलनाला साधी भेटही दिली नाही. दुसरीकडे त्याच दिवशी घाटाखालील शेतकरी नेते प्रशांत डिक्करांच्या आत्मक्लेश यात्रेच्या समारोपाला मात्र त्यांनी पूर्णवेळ हजेरी लावली आणि सभेला संबोधितही केले. त्यामुळे जिल्ह्यात येऊनही शेट्टींनी तुपकरांची भेट घेणे टाळले. यावरून संघटनेत रविकांत तुपकर आणि राजू शेट्टींमध्ये दुरावा वाढतोय का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

Raju Shettey in Buldhana.
Farmers Protest : बुलढाण्यात गुन्हा दाखल झालेल्या शर्वरी तुपकर आहेत कोण?

गेल्या काही दिवसांपासून रविकांत तुपकरांनी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले. मात्र या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टी यांचा उल्लेख केला नाही. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला राजू शेट्टींनी साधी भेटही दिलेली नाही. शेट्टींनी तुपकरांसाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा करूनही तुपकरांनी उमेदवारी नाकारून स्वतंत्र लढण्याचा निर्धार केला.

असे अनेक प्रश्न या दोघांच्या दुराव्याचे कारण बनत आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडींवरून रविकांत तुपकर आणि राजु शेट्टी यांच्यात पून्हा एकदा दुरावा वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आणखी काही स्फोटक घटना घडल्यास नवल वाटून घ्यायला नको. गेल्या काही महिन्यांपूर्वी राजू शेट्टी आणि रविकांत तुपकरांमधील दुरावा वाढला होता. आता पुन्हा काही घटनांवरून तुपकर आणि शेट्टी यांच्यामधील दुरावा वाढत असल्याने चर्चांना मात्र उधाण आले आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Raju Shettey in Buldhana.
Protest For Farmer : कोर्टाने पोलिसांना पुन्हा फटकारले, रविकांत तुपकर यांना...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com