

राज्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडणे कठीण झाले असून उकाड्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतत खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करून काही ठिकाणी शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत, तर काही जिल्ह्यांमध्ये थेट सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
विदर्भातील नागपूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे शनिवार 18 एप्रिल रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या यलो अलर्टनंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, तसेच महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस यांनाही ही सुट्टी लागू करण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे हा निर्णय आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अकोला जिल्ह्यातही उष्णतेचा मोठा परिणाम दिसून येत आहे. येथे शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला असून सकाळी 11 वाजेपर्यंतच वर्ग भरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. ठरवलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ शाळा सुरू ठेवल्यास संबंधित संस्थांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
राज्यातील वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. त्यामुळे नागरिकांनीही आवश्यक ती काळजी घ्यावी, दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, तसेच पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.