Aditya Thackeray On BJP : म्यांव, म्यांवनंतर डरकाळी कशी फुटते आता कळतंय ? ठाकरेंचा भाजपला टोला...

Maharashtra Political News : मुख्यमंत्री प्राणिसंग्रहालयात आले होते, त्यांनी नावासाठी चिठ्ठी काढली मात्र `आदित्य` नाव बघून ते घाबरले.
Aditya Thackeray  News
Aditya Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : `नाम तो सुना होगा`, वाघाच्या बछड्याची आधी म्यांव, म्यांव होते मात्र डरकाळी कशी फुटते हे आता त्यांनाही कळतंय`, असा टोला आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला. (Maharashtra Political News) सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील वाघांच्या बछड्याला नाव देतांना `आदित्य` नावाला विरोध करण्यात आला होता. आदित्य नावाची चिठ्ठी बाजूला सारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार विक्रम नावाला पसंती देत वाघाच्या बछड्याचे नामकरण केले होते.

Aditya Thackeray  News
Maratha Reservation Meeting : मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा दौरा, मोठ्या लढ्याची नांदी ठरणार..

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज सिद्धार्थ उद्यानात जाऊन `विक्रम` नावाच्या बछड्याची आवर्जून भेट घेतली. यावेळी आपल्या नावावरून झालेल्या राजकरणाची आठवण करून देत आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर चांगलीच टोलेबाजी केली. (Shivsena) तो वाघाचा बछडा आहे तरी कसा? हे पाहण्यासाठी आणि त्याला जय महाराष्ट्र करण्यासाठी आपण आल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात अर्पिता नावाच्या पिवळ्या वाघिणीने जन्म दिलेल्या बछड्याचा गेल्या १७ सप्टेंबर रोजी नामकरण सोहळा झाला. (Marathwada) नाव काय ठेवायचे यासाठी काढण्यात आलेल्या चिठ्ठीत `आदित्य` नाव आले होते. मात्र ते नाव नको म्हणत दुसऱ्या नावाची चिठ्ठी काढण्यात आली. या पार्श्वभुमीवर रविवारी आदित्य ठाकरे यांनी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली आणि वाघाचे बछडे पाहिले.

यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री प्राणिसंग्रहालयात आले होते त्यांनी नावासाठी चिठ्ठी काढली मात्र `आदित्य` नाव बघून ते घाबरले असा टोला ठाकरेंनी लगावला. तो वाघाचा नेमका कोणता बच्चा आहे ते बघायचे होते, त्याला जय महाराष्ट्र करण्यासाठी मी आलो होतो. नाम तो सुना होगा, त्या नावाची एवढी भीती का त्यांनाच विचारा. बछड्याला दुरून पाहिले, काहीजण आता म्हणतील की , म्यांव म्यांव केले. पण वाघाचा बछडा सुरुवातीला म्यांव म्यांव करतो नंतर डरकाळी कशी फुटते हे आता त्यांनाही कळतंय, असा चिमटाही त्यांनी विरोधकांना लगावला.

पर्यटन वाढीसाठी अशी संग्रहालये वाढली पाहिजेत. मी पर्यटनमंत्री असताना इथे सफारी पार्कचा प्रस्ताव दिला होता ते सफारी पार्क मंजूर व्हावे, अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड करणारा शिवसेनेचा `होऊ द्या चर्चा` असा लक्षवेधी रथ निघाला आहे. या रथाचे विमानतळावर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पूजन झाले. हा रथ शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी तयार केला आहे. हा रथ गावोगावी फिरून सरकारच्या फसव्या घोषणांचा भांडाफोड करणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com