संजय राठोड यांच्या यवतमाळातील कार्यालयाला सुरक्षा…

शिवसेनेचे यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड (MLA Sanjay Rathod) यांच्या कार्यालयाला पोलिसांनी सुरक्षा दिली आहे.
MLA sanjay Rathod's Office in Yavatmal.
MLA sanjay Rathod's Office in Yavatmal.Sarkarnama
Published on
Updated on

नागपूर : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आता शिवसैनिक पेटून उठला आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केल्यानंतरही बंडखोर परतले नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक चांगलाच आक्रमक झालेला आहे.

एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर महाराष्ट्राचे (Maharashtra) राजकारण ढवळून निघाले आहे. दररोज, दर तासाला हे प्रकरण नवनवी वळणे घेत आहे. कालपासून शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांचे फलक आणि कार्यालये टारगेट केली आहेत. पुण्यातील शिवसैनिकांनी आमदार तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant) यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. याची पुनरावृत्ती महाराष्ट्रभर होऊ शकते. ही बाब लक्षात घेता शिवसेनेचे यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या कार्यालयाला पोलिसांनी सुरक्षा दिली आहे.

यवतमाळात आतापर्यंत अशी कुठलीही अनुचित घटना घडली नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. शिंदेंसह शिवसेनेच्या ४१ आमदारांनी बंड केलं. त्यामुळे राज्यामध्ये एकच खळबळ उडाली. कालपासून राज्यात कुठे न कुठे एकनाथ शिंदे समर्थकांच्या कार्यालयांवर हल्ले केले जात आहेत. हीच आशंका बघता गृहमंत्रालयाने पोलिसांना तात्काळ निर्देशित केले आणि बंडखोर शिवसैनिकांच्या घरातील नातेवाइकांना आणि त्यांच्या कार्यालयाला पोलीस सुरक्षा देण्याची निर्देश दिले आहेत.

MLA sanjay Rathod's Office in Yavatmal.
`दादा भुसे, संजय राठोड यांनी मला शब्द दिला होता, अशा लोकांच काय करायचं?`

यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार संजय राठोड यांनी सुद्धा शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे. म्हणूनच यवतमाळ पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार संजय राठोड यांच्या कार्यालयाला पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. यवतमाळचे पोलीस उपविभागीय अधिकारी संपतराव भोसले आणि अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी स्वतः येऊन राठोड यांच्या कार्यालयाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि तेथे अतिरिक्त पोलीस कुमक सुरक्षेकरिता तैनात करण्यात आली. अद्यापपर्यंत कोणतीही अनुचित घटना घडली नसली तरीही गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार पोलिस पूर्ण खबरदारी घेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com