Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घेतला पुढाकार, अकोल्यातील 'लग्नाळू'साठी वधू शोधण्यासह लग्नाचाही खर्च उचलणार

NCP Politics: विदर्भामधील अकोल्याच्या एका 34 वर्षीय तरुणानं “मला लग्नासाठी पत्नी मिळवून द्या” या भावनिक सादच ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवारांना घातली आहे. या तरुणानं चक्क पवारांनाच पत्र लिहिलं आहे. या पत्राची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.
NCP Sharad Pawar
NCP Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Akola News: सध्याच्या काळात शहरापासून गावापर्यंत 'लग्नाळूं'ची संख्या वाढतच चालली आहे. उच्च शिक्षण, गलेलठ्ठ पगाराची नोकरी, मुलींच्या वाढत्या डिमांडमुळे समाजात मुलांच्या लग्नांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पंचविशीपासून ते चाळीशी गाठलेली एक मोठी पिढी लग्नापासून वंचित असून निराशेच्या गर्तेत सापडली आहे. अशाच एका लग्नाळूनं थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांसमोरच (Sharad Pawar) आपली ही कैफियत मांडली आहे.

विदर्भामधील अकोल्याच्या एका 34 वर्षीय तरुणानं “मला लग्नासाठी पत्नी मिळवून द्या” या भावनिक सादच ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवारांना घातली आहे. या तरुणानं चक्क पवारांनाच पत्र लिहिलं आहे.या पत्राची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनी जयंत पाटलांनाच हे पत्र वाचायला सांगितलं.

या सगळ्या घडामोडींनंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं लग्नाळूच्या पत्रावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शरद पवारांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवारांना लग्नासाठी मुलगी शोधून द्या अशी मागणी करणाऱ्या तरुणासाठी आम्ही स्वतः वधू संशोधन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. एवढंच नव्हे, तर त्याच्या लग्नाचा संपूर्ण खर्च देखील पक्ष उचलणार असल्याचं गावंडे यांनी म्हटलं.

अकोल्यातील लग्नाळूच्या पत्राची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना मदत करण्यासंबंधीच्या सूचना दिल्या होत्या. आम्हाला या तरुणाला मदत करण्याविषयीचे आदेश पक्षाच्या वरिष्ठांकडून आले आहेत. त्यामुळे लवकरच आम्ही त्या तरुणासाठी योग्य वधू संशोधन सुरू करत असून त्याचे आयुष्य सेटल करण्याची जबाबदारी आमचा पक्ष उचलणार असल्याचंही जिल्हाध्यक्ष गावंडे यांनी सांगितलं.

NCP Sharad Pawar
Kangana Ranaut: भाजपच्या वादग्रस्त खासदार कंगना रनौत अडचणीत,थेट देशद्रोहाचा खटला चालणार; अखेर कोर्टानं घेतली अ‍ॅक्शन

शरद पवार हे 8 नोव्हेंबर रोजी अकोला दौर्‍यावर आले होते. यावेळी शरद पवारांना या तरुणाने भावनिक पत्र दिले होते. त्या पत्रात “माझे वय वाढत चालले आहे. भविष्यात माझे लग्न होणार नाही, अशी भीती वाटते. मी एकाकीपणामुळे त्रस्त झालो आहे. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल असं या तरुणानं लिहिलं होतं.

इतकंच नव्हे, तर तिच्या घरी राहायला तयार आहे. तिथे काम करून संसार नीट चालवेन, याची मी हमी देतो. कृपया माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी. तुम्ही मला जीवनदान द्याल. तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही,” असं या तरुणान म्हटले होते. या पत्रात त्याने स्वतःचा मोबाईल नंबर आणि पत्ताही दिल्यानं शरद पवारांसह सर्वच नेते थबकले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com