Sharad Pawar Group : अनिल देशमुख करताहेत विदर्भातील जुन्या शिलेदाराची जुळवाजुळव !

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या लोकांना डावलून हे खातेवाटप केल्याचे दिसत आहे.
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक मोठे नेते अजित पवारासोबत गेले. अजित पवारांकडे सद्यःस्थितीत ३२ आमदार असल्याचे सांगितले जाते. हा आकडा खरा मानल्यास शरद पवारांकडे २१ आमदार राहिलेले आहेत. अशा परिस्थितीत शरद पवारांनी नव्याने पक्षाची बांधणी सुरू केली आहे.

पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना शरद पवारांनी जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत. माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांच्यावर विदर्भाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नागपुरात परत आल्यानंतर देशमुख कामाला लागले आहेत. परवा (ता. १३), काल त्यांचा मतदारसंघ काटोल आणि आज ते अमरावती आणि अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढील दिशा ठरवली जात आहे.

अमरावतीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय खोडके हे अजित पवार गटासोबत गेले आहेत. अमरावतीमध्ये त्यांची चांगली ताकद आहे. त्यांच्या पत्नी सुलभा खोडके कॉंग्रेसच्या तिकिटावर २०१९मध्ये आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे येथे शरद पवार गटाला जास्त जोर लावावा लागणार आहे. जिल्ह्यात पवारांची अनेक जिवाभावाचे जुने लोक आहेत. त्यांना एकत्र करण्याचे काम सध्या सुरू आहे.

आज वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत देशमुख बैठका घेत आहेत. संघटनेच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. अमरावती जिल्ह्यात एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोठी ताकद होती. सर्व जुन्या सहकाऱ्यांना एकत्रित करण्याची जबाबदारी पवारांनी अनिल देशमुख यांच्यावर दिली असल्याचे समजते.

Anil Deshmukh
Anil Deshmukh News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पहिले प्रदेशाध्यक्ष ओबीसी होते, फडणवीसांकडे चुकीची माहिती !

२०१९च्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते पक्ष सोडून गेले होते. तेव्हासुद्धा शरद पवारांनी एकट्यानेच संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) पिंजून काढला. त्यानंतरचे निकाल जनतेने बघितले की, केवळ ५३ आमदारच निवडून नाही आणले, तर महाविकास आघाडीचा प्रयोग करून सत्ताही काबीज केली. त्यामुळे आगामी निवडणुकीतही शरद पवारांचाच बोलबाला असेल, असे आमदार देशमुख यांनी सांगितले.

ज्या पक्षाकडे सदस्यसंख्या जास्त असेल, त्यांचा विरोधी पक्षनेता होतो. महाविकास आघाडीतील पक्षांचे नेते विरोधी पक्ष नेत्याच्या बाबतीत एकत्र बसून निर्णय घेतील. निवडणूक आल्यावर प्रत्येक पक्ष आपले उमेदवार उभे करतील, याचा काही फरक पडणार नाही शरद पवार (Sharad Pawar) जेव्हा दौऱ्यावर बाहेर पडतील त्यावेळी त्यांना प्रतिसाद मिळेल. गोंदिया, भंडारा मधील अनेक पदाधिकारी शरद पवारांना भेटायला गेले होते, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.

Anil Deshmukh
Sharad Pawar यांना मोठा धक्का,महिला आमदाराचा Ajit Pawar यांना पाठिंबा | NCP Splits | MLA Saroj Ahire

अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलताना देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले, सर्व महत्वाचे खाते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आले आहेत, एका अर्थाने पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासाठी हे काळजी करण्याचे कारण आहे. राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व लोक अनुभवी आहेत. एकनाथ शिंदेंच्या लोकांना डावलून हे खातेवाटप केल्याचे दिसत आहे. भविष्यात याचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com