Sharad Pawar NCP: महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला भोपळा,शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा

NCP Politics: विधानसभेच्या निवडणुकीत पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून पेठे हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. या जागेवर काँग्रेसचा दावा होता. तो हिरवून घेतल्याने त्यावेळी काँग्रेसमध्ये मोठी नाराजी होती.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळा फोडता आला नाही. त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनीसुद्धा निवडणूक लढली होती. त्यांनाही आपला प्रभाग राखता आला नाही. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), प्रदेशाध्यक्ष आणि विदर्भाचे नेते अनिल देशमुख यांच्याकडे त्यांनी आपले राजीनामापत्र पाठविले आहे. यामुळे त्यांच्यासोबत लढलेल्या उमेदवारांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 78 उमेदवारांनी महापालिकेची निवडणूक लढली. यात पेठे यांच्यासह माजी आमदार प्रकाश गजभिये यांचासुद्धा समावेश होता. पक्षाचे पाच ते सात उमेदवार निवडून येतील अशी आशा राष्ट्रवादील होता.

निवडणुकीच्या मध्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि राष्ट्रवादीने जिथे जिथे उमेदवार नाही त्या त्या जागेवर एकमेकांच्या उमेदवारांना समर्थन जाहीर केले होते. मात्र त्याचाही फायदा राष्ट्रवादीला झाला नाही. मागील निवडणुकीत पेठे हे एकमेव निवडून येणारे नगरसेवक होते.

विधानसभेच्या निवडणुकीत पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून पेठे हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. या जागेवर काँग्रेसचा दावा होता. तो हिरवून घेतल्याने त्यावेळी काँग्रेसमध्ये मोठी नाराजी होती. याचाही फटाक पेठे यांना बसला होता. भाजपचे कृष्णा खोपडे या मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आले.

Sharad Pawar
AIMIM BJP Alliance: राज ठाकरे, आंबेडकरांना जमलं नाही, ते 'एमआयएम'नं करुन दाखवलं; 125 जागा जिंकल्यानंतर ओवैसींचं भाजपसोबतच्या युतीवर मोठं विधान

विधानसभा लढल्यानंतर पेठे हे महापालिकेची निवडणूक लढणार नाही असे वाटत होते. मात्र कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकण्यासाठी त्यांनी ही निवडणूक लढण्याचे ठरवले होते.

काँग्रेससोबत आघाडीचेही प्रयत्न झाले. काँग्रेसने 11 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ केल्या होत्या. मात्र शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडी तुटली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com