Vidarbha News : लोकसभेच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीने चांगलाच माहौल केला होता. विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे निवडून आल्याने विधानसभेत तुतारी जोरदार वाजणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, अनेक दिग्गज उमेदवार देऊनही विदर्भातील एकाही मतदारसंघात विजयाची तुतारी वाजलीच नाही. Maharashtra Election Assembly 2024 Result news
विदर्भात शरद पवार (Sharad Pawar) यांनी 12 उमेदवार तुतारीवर उभे केले होते. यात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख काटोल विधानसभा, हिंगणा विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री रमेश बंग, पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून दुनेश्वर पेठे, तुमसरमध्ये चरण वाघमारे, बुलढाणा जिल्ह्यतील सिंदखेडराजा मतदारसंघातून माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासह अनेक आमदारांचा समावेश होता.
मोर्शी विधानसभा मतदारसंघात गिरीश कराळे, लोकसभेत निवडून आलेले अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे, तिरोडा मतदारसंघात रविकांत बोपपचे, मूर्तीजापूर विधानसभा मतदारसंघात सम्राट डेंगरदिवे, करंजा विधानसभा मतदारसंघात राजेंद्र पाटणी, पुसदमध्ये शहद मैंद, अहेरीत भाग्यश्री आत्राम, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघात माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या हातात तुतारी सोपवली होती. यापैकी एकालाही विजयाची तुतारी वाजवता आली नाही.
शरद पवार यांना अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे, काटोलमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख, सिंदखेड राजामध्ये माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, अहेरीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्याकडून मोठी अपेक्षा होती. राजेंद्र शिंगणे अडीच वर्षे अजित पवार यांच्यासोबत महायुतीत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.