Vijay Malokar : अकोल्यात ठाकरेंना धक्का; कट्टर शिवसैनिकाचा भाजपात प्रवेश

Akola Bjp News : अकोल्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला
Vijay Malokar Akola
Vijay Malokar Akola Sarkarnama
Published on
Updated on

Akola Bjp News : अकोल्यातील ठाकरे गटाचे नेते आणि शिवसेना महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचा (ठाकरे गट) राजीनामा दिला होता. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. विजय मालोकार यांनी राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत विजय मालोकार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मालोकार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये अकोल्यात भाजपला ताकद मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विजय मालोकार यांच्या राजीनाम्याने अकोल्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी आज भाजपमध्ये (BJP ) प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशाने ठाकरे गटाला येणाऱ्या काळात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Vijay Malokar Akola
Uddhav Thackeray : शिंदे-फडणवीस सरकारने आदित्यची केली कोंडी; उद्धव ठाकरे आपल्या फौजेसह मैदानात

विजय मालोकार यांची राजकीय कारकिर्द कशी आहे?

विजय मालोकारांनी विविध पदे भूषवलेली आहेत. अकोला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, तसेच यवतमाळ आणि वाशिमचे माजी सहसंपर्कप्रमुख, १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात एसटी महामंडळाचे संचालक, १९९९ मध्ये बोरगावमंजू (आताचा अकोला पूर्व) मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी, २००४ मध्ये बोरगावमंजू मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अत्यल्प मतांनी पराभव, तसेच अपक्ष उमेदवार म्हणून घेतली होती ४० हजारांवर मते, २००९ मध्ये अकोला पूर्व मतदारसंघातून अपक्ष म्हणून ३० हजार मतं घेतली होती. तर आता विजय मालोकार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com