Uddhav Thackeray : शिंदे-फडणवीस सरकारने आदित्यची केली कोंडी; उद्धव ठाकरे आपल्या फौजेसह मैदानात

Uddhav Thackeray News : राजकारण तापण्याची शक्यता
Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Sanjay Raut
Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय.

मात्र आता आदित्य ठाकरे यांच्यासाठी उद्धव ठाकरे हे आपल्या फौजेसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई यांच्यासह अजून काही नेत्यांच्या फौजेसह ते उद्या नागपुरात दाखल होण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबद्दल ठाकरे गट सत्ताधाऱ्यांना जोरदार प्रतिउत्तर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

याच प्रकरणावरून अधिवेशनामध्ये गदारोळ देखील झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्या आधी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Sanjay Raut
Sanjay Raut : 'उद्धव ठाकरे उद्या नागपुरात मोठा राजकीय बॉम्ब फोडणार'

दरम्यान, या सर्व आरोप-प्रत्यारोपानंतर आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांना जोरदार प्रतिउत्तर देण्यासाठी तसेच अधिवेशनामध्ये ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी स्वत:उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

तसेच खासदार संजय राऊत यांनी आपण उद्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबरोबर नागपुरात जाऊन मोठा राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचं मुंबईत बोलताना म्हटलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आता उद्या नागपुरात नेमकं कोणता राजकीय बॉम्ब फोडणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Sanjay Raut
Raosaheb Danve : बाजार समितीत चुरशीने मतदान; दानवेंसमोर २५ वर्षाची सत्ता राखण्याचे आव्हान

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

''फेब्रुवारी पर्यंत काय करायचे ते करून घ्या. नंतर तुम्ही राहणार नाही. हे सरकार अलिबाबा चालीच चोर आहे. पण लवकरच अलिबाबा जाणार आणि चाळीस चोरही. त्यानंतर पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असणार आणि ते देखील उद्धव ठाकरेच असतील. मला तुम्ही तुरुंगात टाकलं. तुम्हाला वाटलं तुरुंगात टाकल्यावर गप्प बसेल, पण नाही हा कट्टर शिवसैनिक आहे दबणार नाही''.

''तुम्ही मला ज्या तुरुंगात ठेवलं. त्याच तुरुंगात आणि त्याच खोलीत तुम्हाला देखील ठेवणार आहे. आम्ही फायली देखील तयार करून ठेवल्यात. आम्ही बदला घेतल्या शिवाय शांत बसणार नाही. तुम्ही पाठीत खंजीर खुपसला. पण आम्ही पुढून खंजीर खुपसणार आहोत. उद्या उद्धव ठाकरे यांच्याबरोबर नागपुरात जाऊन मोठा बॉम्ब फोडणार आहे'', असं म्हणत राऊतांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com