Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात ठरणार यवतमाळ-वाशीमचा उमेदवार

Shiv Sena : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर आता उद्धव ठाकरे देखील येणार मतदारसंघात.
Yavatmal Lok Sabha Election.
Yavatmal Lok Sabha Election.Sarkarnama

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतो. त्यामुळेच आता सगळ्याच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात येऊन रणशिंग फुकले असतानाच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही विदर्भातील मतदारसंघावर ‘फोकस’ केला आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आता यवतमाळ-वाशीमच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात यवतमाळ-वाशीमचा शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात उध्दव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय प्रत्युत्तर देतात हे पाहावे लागणार आहे. 12 आणि 13 मार्चला उद्धव ठाकरे यांचा यवतमाळ-वाशीम दौरा होणार आहे.

लोकसभा निवडणुक जसजशी जवळ येत आहे. तसतसे सर्वच पक्षाच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ मतदारसंघात येऊन निवडणुकीचे रणशिंग फुकले होते. आठ दिवस होत नाही तोच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यवतमाळ-वाशीम मतदारसंघात येऊन विविध कार्यक्रम घेतले. आता या विरोधात रणशिंग फुकण्यासाठी स्वतः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे यवतमाळ-वाशीमच्या दौऱ्यावर येणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा यवतमाळ-वाशीम दौरा हा महत्वाचा मानला जात आहे. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडून या मतदारसंघावर दावा केला जात आहे. हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सुटणार आहे. हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Yavatmal Lok Sabha Election.
Yavatmal-Washim Lok Sabha Constituency : यवतमाळ-वाशीम मतदारसंघात शिवसेनेकडून संधीची संजय राठोड यांना अपेक्षा

शिवसेनेत फुटीनंतर या मतदारसंघातील विद्यमान खासदार भावना गवळी यांनी ठाकरेंना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदार आणि खासदारांना घेरण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. ज्या मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार हे उद्धव ठाकरे यांना सोडून गेले त्या मतदारसंघावर विशेष लक्ष स्वतः उद्धव ठाकरे यांच्याकडून घालण्यात येत आहे. अशातच यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार भावना गवळी यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे. भावना गवळी यांना ‘चारो खाने चित’ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे. त्यामुळेच आता उद्धव ठाकरे हे स्वतः यवतमाळ-वाशीम दौऱ्यावर येणार आहेत.

एकीकडे भावना गवळी यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध केला जात आहे. भावना गवळी यांची उमेदवारी धोक्यात असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. या मतदारसंघासाठी भाजप आग्रही असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ असल्याने महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला हवा आहे. काँग्रेसही या मतदारसंघासाठी इच्छुक आहे. उद्धव ठाकरे यांचा यवतमाळ-वाशीम दौरा अशात महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.

Yavatmal Lok Sabha Election.
Farmer Audio Clip Viral | मोदी सरकारचे नाव घेताच शेतकरी भडकला, ऑडिओ क्लिप व्हायरल | Yavatmal

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या यवतमाळ-वाशीम दौऱ्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही यवतमाळ-वाशीममध्ये येणार असल्याचे पश्चिम विदर्भातील ठाकरे गट उत्साही आहे. 12 आणि 13 मार्चला स्वतः उद्धव ठाकरे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात पदाधिकारी बैठक आणि संवाद मेळावे घेण्यासाठी येणार आहेत. 12 मार्चला राळेगाव येथे दुपारी 12 वाजता, पुसद येथे सायंकाळी 6 वाजता ठाकरे संवाद मेळावा घेणार आहेत. त्यांनंतर ते माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या घरी मुक्कामी राहणार आहेत. 13 मार्चला उद्धव ठाकरे वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे 12 वाजता, सायंकाळी 6 वाजता वाशीम शहरात मेळावा घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनकडून यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात उमेदवाराची अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Yavatmal Lok Sabha Election.
Yavatmal - Washmim : स्त्री-पुरुष समानतेच्या निव्वळ बाताच, आरक्षणाचं नेमकं होणार काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com