Buldhana News : बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाची विकास कामे तातडीने करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर याबाबत बैठकीमध्ये आदेश देण्यात आले होते. आदेश देऊनही संबंधित अधिकारी गांभीर्याने विषय हाताळत नसल्याचे पुढे आले होते. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत उपोषणाचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही ग्रामीण भागातील विकास कामांबाबत मंत्रालयाचे अधिकारी अनुकूल दिसत नसल्याची तक्रार शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केली होती. 12 सप्टेंबर 2024 च्या आत कामे मंजूर न केल्यास आपल्या विरोधात मंत्रालयावरील सातव्या मजल्याच्या गच्चीवर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. (Sanajay Gaikwad News)
बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाची विकास कामे तातडीने मार्गी न लागल्यास त्यासोबतच होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी आपली राहील, असे पत्र आमदार संजय गायकवाड यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना लिहले आहे.
बुलढाणा विधानसभा क्षेत्रातील महत्त्वाची विकास कामे तातडीने करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर या संदर्भीय बैठकीमध्ये निर्देशित करूनही संबंधित अधिकारी गांभीर्याने विषय हाताळत नसल्याचे पुढे आले होते. 24 जुलै 2024 चे प्रोसिडिंग सुद्धा लिहून पूर्ण झाले नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे.
गेल्या दोन्ही बैठकीमध्ये ही कामे एका महिन्यांत पूर्ण करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री महोदयांना सांगून सुद्धा अद्यापपर्यंत कामे मंजुरी संदर्भात कार्यवाही झाली नसल्याने संजय गायकवाड हे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना पत्र लिहिले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.