Lok Sabha Election 2024 : प्रतापराव जाधव यांच्याऐवजी शिवसेनेचा ‘प्लान बी’

Shiv Sena on BJP : बुलढाणा मतदारसंघ भाजपच्या तावडीतून सोडविण्यासाठी एकनाथ शिंदे गटापुढे उमेदवार बदलाचा पर्याय. संजय गायकवाड यांचे जिल्हाभरात संपर्क अभियान
Sanjay Gaikwad & Prataprao Jadhav.
Sanjay Gaikwad & Prataprao Jadhav.Sarkarnama

Lok Sabha Election 2024 : शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाला भाजपच्या ताब्यात जाण्यापासून वाचविण्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाने आता ‘प्लान बी’ तयार केला आहे. भाजपकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचा क्रमांक प्रबळ उमेदवारांच्या यादीत घसरल्याने भाजपने या मतदारसंघावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेला हा मतदारसंघ भाजपला देण्याची अजिबात इच्छा नसल्याने प्रतापराव जाधव यांच्याऐवजी आता शिवसेनेचे बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या नावाची चर्चा आता पुढे आली आहे. शनिवारी (ता. 9) गायकवाड यांचे नाव अचानक पुढे आहे.

प्रतापराव जाधव यांना जनाधार उरला नसल्याने बुलढाणा लोकसभा मतदारसंघ ताब्यात द्यावा, अशी भावना भाजपकडून महायुतीत व्यक्त होत आहे. बुलढाणा, यवतमाळ-वाशीम, रामटेक मतदारसंघावरून सध्या महायुतीत विचारमंथन सुरू आहे. अशात बुलढाण्याचा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या ताब्यात जाऊ नये, असा प्रयत्न शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे प्रतापराव जाधव चालत नसतील तर संजय गायकवाड यांना संधी द्यायला काय हरकत आहे, असा प्रस्ताव शिवसेना भाजपपुढे ठेवणार आहे. त्यामुळे जाधवांचा पत्ता कटून कदाचित गायकवाड यांना लॉटरी लागण्याची दाट शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Gaikwad & Prataprao Jadhav.
Sanjay Gaikwad : शिवसेना सोडून जाणाऱ्या नगरसेवकांचे बघाच आता काय होते!

संजय गायकवाड हे बुलढाणा विधानसभेचे आमदार असले तरी तरी जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. संजय गायकवाड आणि त्यांचे सुपुत्र कुणाल ऊर्फ मृत्युंजय गायकवाड बुलढाण्याच्या कानाकोपऱ्यात फिरून जनसंपर्क कायम ठेवून आहेत. अगदी बारशापासून तर तेरवीपर्यंतच्या सगळ्याच कार्यक्रमांमध्ये संजय आणि कुणाल यांचे दौरे सुरूच असतात. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ग्रामीण मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. इतर प्रगत शहरांच्या तुलनेत बुलढाणा मतदारसंघातील राजकारण फारच वेगळे आहे. ग्रामीण भाग अधिक असल्याने खेड्यातील चालीरिती मानणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे आजही येथे एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी झाले नाही तर नाराज होणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे.

वनसंपदा, घाट आणि मेळघाटाला लागून असल्याने बुलढाणा मतदारसंघ आजही अविकसित भागांमध्ये मोडतो. शेतकऱ्यांची संख्या या जिल्ह्यात प्रचंड आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण जनतेकडे दुर्लक्ष करून येथे राजकारण करताच येत नाही. अगदी शुद्ध आणि हायफाय भाषा बोलणाऱ्यांऐवजी बुलढाण्यात आजही ‘मले तुले.. काऊन कायले’ बोलणारा येथील जनतेला आपलासा वाटतो. त्यामुळेच रविकांत तुपकर आणि संजय गायकवाड हे या भागातील लोकांना आपलेसे वाटतात. ही बाब हेरत शिवसेनेकडून आता प्रतापराव जाधव यांच्याऐवजी संजय गायकवाड यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. गायकवाड यांच्या नावाची चर्चा सुरू करून शिवसेनेने आता चेंडू भाजपच्या कोर्टात टाकून दिला आहे. महायुतीमधील जागावाटपाची चर्चा जवळपास 80 टक्के पूर्ण झाली आहे. अशात बुलढाणासारख्या उरल्यासुरल्या जागांबाबतचा तिढाही लवगरच सुटेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Sanjay Gaikwad & Prataprao Jadhav.
शिवजयंतीच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर संजय गायकवाडांचे स्पष्टीकरण | Sanjay gaikwad

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com