Sanjay Gaikwad : शिवसेना सोडून जाणाऱ्या नगरसेवकांचे बघाच आता काय होते!

Buldhana News : मोताळा नगरपंचायतमधील 15 जणांना आमदार संजय गायकवाड यांची धमकी. काँग्रेस सोडत आले होते शिवसेना पक्षात. पुन्हा केली घरवापसी
Motala Nagar Panchayat Members
Motala Nagar Panchayat MembersSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Gaikwad : काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या आठ नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांनी घरवापसी करीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात प्रवेश केला. आपण सर्व स्वगृही परतल्याची घोषणा नगरसेविकांनी केली. मात्र, यावर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या या नगरसेवकांना सूचक इशारा दिला आहे. ते म्हणाले की, पुढच्या 15 दिवसांत त्यांचे काय होईल, हे दिसून जाईल.

2022 मध्ये झालेल्या मोताळा नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये 18 पैकी 12 सदस्य काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. नंतरच्या काळात काही गैरसमज झालेत. गैरसमजातून पक्षामध्ये फूट पडत आठ नगरसेवकांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात प्रवेश केला. शिवबंधन हातावर बांधल्यानंतर या नगरसेवकांनी कामाला सुरुवात केली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागामार्फत विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणार, असे आश्वासन दिले होते. तसे काहीही झाले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Motala Nagar Panchayat Members
Shiv Sena : मारहाणप्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेविरुद्ध ठाकरेंची सेना बुलढाण्यात आक्रमक

मागील वर्षभरात आमदार संजय गायकवाड यांनीही शहराचा विकास केला नसल्याचा ठपका ठेवत पुन्हा घरवापसी म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. ‘सुबह का भुला शामको घर लौट आए, तो उसको भुला नही कहते’ अशा म्हणीचा दाखला देत नगरसेवक शहनाज बी शेख सलीम, हसमद बी जलील खान, खातून बी शेख रशीद, शिला कैलास खर्चे, परवीन बी आसिफ आणि शेख तस्लीम शेख सलीम यांचे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा पक्षात स्वागत केले. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायत हे शहर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानसभा मतदारसंघात येते. मतदारसंघातील सर्वांत महत्त्वाचे शहर म्हणून मोताळ्याकडे पाहिले जाते.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाकडे असलेली नगरपंचायत गेल्याने आमदार गायकवाडांना दुःख तर झालेच, पण अत्यंत सहजपणे हसतहसत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत म्हणाले की, राज्यात सकाळचा माणूस दुपारी कोणा पक्षात जाईल आणि दुपारचा सायंकाळी कोणत्या पक्षात जाईल हे काही नवीन नाही. पुढच्या 15 दिवसांत या नगरसेवकांचे काय होईल, हे पण दिसून जाईल, असा धमकी वजा इशारादेखील त्यांनी काँग्रेसमध्ये गेलेल्या नगरसेवकांना दिला आहे. आमदार गायकवाड जे बोलतात ते करतातच. त्यामुळे ऐन वेळेवर पक्ष सोडून जाणाऱ्या नगरसेवकांसोबत आता काय होते ? याबाबत जिल्ह्यामध्ये विविध चर्चांना ऊत आला आहे. आमदार गायकवाड यांच्या या सूचक धमकीमुळे काँग्रेस पक्षाचे नेतेही ‘अलर्ट मोडवर’ आलेले असून, त्यांनी मोताळा नगरपंचायतीमधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात आलेल्या नगरसेवकांना फोन करून आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहोत घाबरायचे कारण नाही, असा धीर दिल्याची माहिती समोर येत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Motala Nagar Panchayat Members
Shiv Sena : हट राजेहो पुडीच निघाली! गायकवाडांच्या गळ्यातील दात वाघाचा नव्हे चारआण्याच्या प्लास्टिकचा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com