
Satish Harde appointment : दोन जिल्हा प्रमुख, तीन शहर प्रमुख आणि एक संपर्क नेता, असा लवाजमा असतानाही कोणी कोणाच्या फारशा संपर्कात नसलेल्या नागपूर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने आता संपर्क प्रमुखपदी सतीश हरडे यांची नियुक्ती केली आहे.
अनेक वर्षे गोंदिया, भंडारा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सतीश हरडे यांना परत, नागपूर शहरात आणून शिवसेना ठाकरे सेना पक्षाने कार्यकारिणी बदलाचेही संकेत दिलेत.
विशेष म्हणजे, सतीश हरडे हे यापूर्वी नागपूर (Nagpur) जिल्ह्याचे दोन वेळा जिल्हाप्रमुख होते. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूकसुद्धा लढले आहेत. मागील काही वर्षांपासून ते नागपूर जिल्ह्यातील अंतर्गत भांडणे आणि मतभेदांपासून दूर होते. नागपूर सोडून ते गोंदिया, भंडारा जिल्ह्याचे सहसंघटक होते. आता संपर्क प्रमुख या नात्याने त्यांची पुन्हा नागपूर शहरात एंट्री झाली आहे.
नागपूर शहरात प्रमोद मानमोडे आणि माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, असे दोन्ही जिल्हाप्रमुख आहेत. नितीन तिवारी, दीपक कापसे आणि प्रवीण बरडे हे शहरप्रमुख आहेत. भास्कर जाधव पूर्व विदर्भाचे संपर्क नेते आहेत. मानमोडे आणि कुमेरिया यांनी दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने (Congress) हा मतदारसंघ सोडण्यास ठाम नकार दिला.
रामटेक वगळता शिवसेना उद्धव ठाकरे सेना पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत एकाही मतदारसंघात प्रतिनिधित्व देण्यात आले नव्हते. त्यातच एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे सेना पक्षाला गळती लागली होती. यापूर्वीच नागपूर शहराचे संपर्कप्रमुख व माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत यापूर्वीच दाखल झाले आहेत. तेव्हापासून हे पद रिक्तच ठेवण्यात आले होते.
जुने शिवसैनिक या नात्याने सतीश हरडे यांचा सर्वांसोबत संबंध आहेत. विद्यमान कार्यकारिणी ही दुष्यंत चतुर्वेदी यांच्या कार्यकाळातील आहे. त्यांनी काँग्रेसमधून आलेल्या नवख्यांना पदे वाटप केल्याने आरोप होता. त्यामुळे अनेक निष्ठावंत दुखावले होते. माजी जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यापूर्वीच पक्ष सोडून गेले आहेत. शहर प्रमुख प्रवीण बरडे अनेक वर्षांपासून नसल्या सारखेच आहेत. दोन जिल्हा प्रमुखांची तोंडे दोन दिशेला आहेत. उद्धव सेना महायुतीत सहभागी झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने आघाडीचा निर्णय स्थानिक नेत्यांकडे सोपवला आहे.
काँग्रेसचे स्थानिक नेते महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी करण्याच इच्छुक नाहीत. अशा विपरित परिस्थिती हरडे यांच्यावर संपर्क मंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. हरडे यांच्या नेतृत्वात उद्धव सेनेने यापूर्वी दोनवेळा नागपूर महापालिकेच्या निवडणूक लढल्या आहेत. नव्या निवड, नियुक्त्या आणि महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपाचा अधिकार संपर्कप्रमुख या नात्याने आता हरडे यांच्याकडे येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.