Nitin Gadkari At Washim : गडकरी म्हणाले, मी कुणाला फुकट मदत करत नाही; कारण...

Gadkari's Statement : हा मंत्री आहे. याच्याकडे हरामाचा पैसा असेल.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Washim District Political News : साधी राहणी आणि परखड व थेट बोलण्यासाठी नितीन गडकरी प्रसिद्ध आहेत. मी आपलं काम करतो. तुम्हाला मते द्यायची असतील, तर द्या नाहीतर जाऊ द्या, असं फक्त आणि फक्त गडकरीच बोलू शकतात. आज पश्‍चिम विदर्भातील वाशीम येथेही गडकरींनी असेच एक वक्तव्य केलं आहे. त्याची जोरात चर्चा सुरू आहे. (This is the minister. He will have black money)

हल्ली मी कुणालाही फुकट मदत करत नाही. फुकट मदत केली की लोकांचे गैरसमज होतात. हा मंत्री आहे. याच्याकडे हरामाचा पैसा असेल. त्यातून हा मदत करतोय. आपल्या खिशातले पैसे कुठे देतोय. असा लोकांचा समज होतो. त्यामुळे मी असा प्रकार करत नाही, असे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

शिवारफेरीसाठी गडकरी आज (ता. २९) अकोला जिल्ह्याच्या दोऱ्यावर होते. दरम्यान, वाशीम येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी उपरोक्त वक्तव्य केले. ते म्हणाले, फुकट मदत केली की त्याची लोकांना किंमत नसते. उलट ते चुकीची चर्चा करू लागतात. अलीकडेच आपण डिजिटल कर्णयंत्राचे वाटप केले. १५ हजारांचे यंत्र १५०० रुपयांत वाटले. हेच फुकट वाटले असते तर लोकांना त्याची किंमत कळली नसती, असेही गडकरी म्हणाले.

आपण स्वत: शेतकरी असल्याने विदर्भातील चित्र बदलण्याचा प्रयत्न करीत आहोत. शेवटी आपला अन्नदाता शेतकरी आहे. शेतकऱ्याने आता ऊर्जा निर्माण केली पाहिजे, यासाठी काम करत आहे. बरेचसे काम झाले आहे आणि बरेच बाकी आहे. पण येत्या काळात शेतकरी हा विमानाचा इंधनदाता होईल, अशी स्थिती आज आहे, असे गडकरींनी सांगितले.

मी नागपूरचा खासदार आहे. पण सोबतच दिल्लीत मी महाराष्ट्राचे नेतृत्व करतो. विदर्भाच्या विकासासाठी येथील खासदार, आमदार प्रयत्न करतात, त्यांच्यासोबत मी ताकदीने उभा आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. हा आकडा १० हजारांच्या घरात आहे. हे विदर्भासाठी निश्‍चित चांगले नाही. हे चित्र बदलवायचं आपण ठरवलं तर अवघड काहीच नाही. आपल्याला विदर्भाची स्थिती याहूनही चांगली करता येईल.

विदर्भाची स्थिती बदललीय...

विकासाच्या बाबतीत विदर्भ आता प्रगतीच्या मार्गावर धावू लागला आहे. आधीसारखी परिस्थिती आता येथे नाही. यासाठी मी एकट्यानेच नव्हे तर सर्व राजकीय पक्षांच्या लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. हा वेग असाच कायम राहिला, तर यापेक्षाही पुढे विदर्भाला नेता येईल. मी विदर्भाचा पुत्र आहे. त्यातल्या त्यात नागपूरचा आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भाच्या विकासासाठी आणखी जे काही करता येणे शक्य आहे, ते मी करणार असल्याचे गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari
Nitin Gadkari News : शिवारफेरी मंत्र्यांसाठी की शेतकऱ्यांसाठी? पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांमध्ये रोष !

लवकरच एक अत्याधुनिक लॅबची उभारणी करणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. या लॅबमधील टेस्टही माफक दरांमध्ये असणार आहेत. रात्रंदिवस ही लॅब सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोव्हिडच्या काळात आपण १०० कोटींचे साहित्य विदर्भात वाटल्याची माहितीही त्यांनी दिली. कोव्हिडचा तो काळ कठीण होता. पण त्यालाही आपण सारे सामोरे गेलो असंही नितीन गडकरी म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Nitin Gadkari
Nitin Gadkari News : माजी नगरसेवकाने सांगितली अडचण, अन् गडकरींच्या थेट संचालनालयाला सूचना !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com