Krupal Tumane Politics : शिवसेनेचे ‘चाणक्य' रामटेकमध्ये : खासदार तुमानेंची धाकधूक वाढली

Ramtek Politics : रामटेक लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरवण्यासाठी शिंदे सेनेच्यावतीने ‘चाणक्य'ची मदत घेतल्या जात आहे.
MP Krupal Tumane
MP Krupal Tumane Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Politics : रामटेक लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरवण्यासाठी शिंदे सेनेच्या वतीने ‘चाणक्य'ची मदत घेतली जात आहे. चाणक्यचा चमू चार दिवस रामटेकमध्ये मुक्कामाला होता . नागपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ व त्या अंतर्गत असलेल्या तालुक्यांमध्ये जाऊन त्यांनी नागरिकांचा कौल जाणून घेतला असल्याचे समजते.

राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे कृपाल तुमाने दोनवेळा निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी होऊन ते सुद्धा शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. याच मतदारसंघातील रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष जयस्वाल हे सुद्धा शिंदे सेनेते आहे. सध्या ते खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आहेत. नागपूर जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व आहे. भाजप-शिवसेना युती असल्याने तुमाने यांना निवडणूक जिंकण्यासाठी फार मदत झाली.

आता राज्यातील सर्वच समीकरणे बदलली आहेत. भाजप-शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महायुती आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात भाजपचे अनेक दावेदार आहेत. ते आपल्याकडे खेचून घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदे सेनेचे या जिल्ह्यात फारसे वर्चस्व नाही. शिवसेना मात्र अद्याप शाबूत आहे. चारदोन पदाधिकारी व कार्यकर्ते सोडल्यास शिंदे सेनेत कोणी सहभागी झालेले नाही. त्यामुळे हा मतदारसंघ आम्हाला द्या, अशी मागणी भाजपच्यावतीने केली जात आहे.

दुसरीकडे कृपाल तुमाने हेसुद्धा चांगलेच सक्रिय झाले आहेत. असे असले तरी निवडून येण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही, हेसुद्धा तितकेच खरे आहे. भाजपला कुठल्याही परिस्थिती राज्यातील ४० जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे बारकाईने नियोजन केले जात आहे. तुमाने विजयी होणार असतील तर त्यांना उमेदवारी दिली जाईल.

मात्र शिंदे सेना सहजासही आपली लोकसभेची जागा सोडणार नाही. वाटाघाटीत ही जागा सोडायची असेल तर काही ठोस कारणही लागणार आहे. त्यामुळे शिंदे सेनेच्यावतीने चाणक्य या संस्थेकडे सर्वेचे काम सोपवण्यात आले होते. त्यांचा अहवाल अद्याप समोर आला नाही. मात्र चाणक्यच्या अहवालावर तुमाने यांचे भवितव्य अवलंबून राहणार हे निश्चित.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com