Cricketnama 2023 : शिवसेनेचा पोलार्ड मालिकावीर; झिशान यांना 'हॅट्‌ट्रिक'साठी पुरस्कार!

Cricketnama prize distribution : पटोलेंचे सूचक विधान म्हणाले, 'विजयाची ही तर आता सुरुवात'
Cricketnama prize distribution
Cricketnama prize distributionSarkarnama
Published on
Updated on

Nagpur : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर ) : अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात शिवसेना (शिंदे गट) 10 धावांनं नमवत काँग्रेसच्या टीमने सकाळ माध्यम समूहाच्या ‘सरकारनामा’या राजकीय वेबपोर्टलच्यावतीने आयोजित ‘क्रिकेटनामा’च्या दुसऱ्या सीझनचं विजेतेपद पटकावलं.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आणि स्पर्धेचे निमंत्रक तथा माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते विजेचा संघाचा ‘क्रिकेटनामा’ चषक प्रदान करण्यात आला. शिवसेनाचा (शिंदे गट) पोलार्ड मालिकावीर ठरला.

मेकोसाबाग परिसरात असलेल्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी, मेथोडीस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड, श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंड परिसरात ‘क्रिकेटनामा’चे मंगळवारी (ता. 12) दुसऱ्या दिवसाचे दिमाखदार सामने खेळण्यात आले.

राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार स्वागताध्यक्ष व माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके निमंत्रक असलेल्या दुसऱ्या सीझनमधील स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. आमदार धीरज लिंगाडे, ‘सरकारनामाचे’ संपादक ज्ञानेश सावंत यावेळी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Cricketnama prize distribution
Cricketnama 2023 : 'क्रिकेटनामा'च्या अंतिम सामन्यात काँग्रेसचे शिलेदार ठरले शिवसेनेवर भारी!

माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते उत्कृष्ट गोलंदाजीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खेळाडू समीर शेख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. आमदार पटोले यांनी उत्कृष्ट फलंदाजीसाठी काँग्रेसचे सलमान सुफी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी या पितापुत्रांना ट्रॉफी प्रदान करण्यात आली. मालिकाविराचा पुरस्कार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खेळाडू पोलार्ड बाजवा यांना नाना पटोले आणि डॉ. परिणय फुके यांनी संयुक्तपणे प्रदान केला.

काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील अंतिम सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार ‘सरकारनामा’चे संपादक ज्ञानेश सावंत यांनी काँग्रेसचे सलमान सुफी यांना प्रदान केला. ‘क्रिकेटनामा’च्या सीझनमधील पहिली हॅट्‌ट्रिक केल्याबद्दल काँग्रेसचे झिशान सिद्दीकी यांना आमदार पटोले यांनी सन्मानित केले.

आमदार धीरज लिंगाडे यांच्या हस्ते उपविजेता शिवसेना (शिंदे गट) ट्रॉफी प्रदान करण्यात आली. नीलेश नातू आणि आकाश मांजरेकर यांनी सूत्रसंचालन केलं. ‘सरकारनामा’चे विभागीय वरिष्ठ प्रतिनिधी अतुल मेहेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Cricketnama prize distribution
Cricketnama 2023 : उपांत्य सामन्यात राष्ट्रवादीला पराभूत करत शिवसेना 'Final'मध्ये दाखल!

‘सरकारनामा’ने उपराजधानी नागपुरात ‘क्रिकेटनामा’चा दुसरा सीझन घेतल्याबद्दल माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी आनंद व्यक्त केला. पुण्यातनंतरचा नागपुरात हे सामने यशस्वी झाल्याबद्दल त्यांनी ‘सरकारनमा’चे कौतुक केले.

स्पर्धेच्या माध्यमातून सर्वच पक्षांचे आमदार एकत्र आल्याचे ते म्हणाले. आगामी काळात होणाऱ्या ‘क्रिकेटनामा’मध्येही आपण नक्कीच सहभागी होऊ, असं डॉ. फुके यांनी आवर्जुन नमूद केलं.

सर्वच सामने थरारक

उपविजेता शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कर्णधार पुरूषोत्तम जाधव म्हणाले की, शिंदेंच्या शिलेदारांनी मैदान लढविण्यासाठी काट्याची टक्कर दिली. हे खेळाचं मैदान आहे. त्यामुळं जय-पराजय सुरूच राहतो. उपविजेता असलो तरी या शब्दामागे विजेता असा शब्द लागलेलाच आहे.

विजयाची सुरुवात

काँग्रेसची टीम विजयी झाल्यानंतर ‘क्रिकेटनामा’च्या मैदानावर आमदार नाना पटोले यांनी सूचक वक्तव्य केलं. ते म्हणाले की, ही विजयाची सुरुवात आहे. ‘आगे आगे देखीए होता है क्या..’ लवकरच आमचं सरकार येणार आहे. त्यामुळं ‘क्रिकेटनामा’चं मैदान मारणाऱ्यांना कॅबिनेट मंत्रिमंडळात प्राधान्य द्यावं लागेल अशी मिश्किल टीप्पणीही त्यांनी केली. काँग्रेसचही खिलाडूवृत्ती मैदानात दिसली असंही ते म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com