Cricketnama 2023 : उपांत्य सामन्यात राष्ट्रवादीला पराभूत करत शिवसेना 'Final'मध्ये दाखल!

Shivsena Wins against NCP Team : आता अंतिम सामना हा शिवसेना रायडर्स विरुद्ध काँग्रेस वॉरीयर्स असा रंगणार आहे.
Shivsena Vs NCP
Shivsena Vs NCPSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena Riders Vs NCP (AP) Lions : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) : अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)(Ajit Pawar) संघावर विजय मिळवला. त्यामुळे आता शिवसेना रायडर्स आणि काँग्रेस वॉरीयर्ससोबत अंतिम सामन्यात लढत देणार आहेत. या सामन्यात शिवसेनेने (शिंदे गट) नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

मेकोसाबाग परिसरात असलेल्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी, मेथोडीस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड, श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंड परिसरात ‘क्रिकेटनामा’चे मंगळवारी (ता. 12) दुसऱ्या दिवसाचे दिमाखदार सामने खेळण्यात आलेत.

राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार स्वागताध्यक्ष व माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके निमंत्रक असलेल्या दुसऱ्या सीझनमधील स्पर्धेचा सातवा सामना राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) आणि शिवसेना रायडर्स यांच्यात झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shivsena Vs NCP
Cricketnama 2023 : नागपुरात नाना पटोलेंना फटका बसणार की शिंदे गट हवा करणार?

सामन्याला सुरुवात होत नाही तोच सलामीवीर राष्ट्रवादीचे सारंग हे बाद झाले. त्यानंतर लगेच विशाल खांडेकर धावबाद झाले. पोलार्ड बाजवा यांनी या दोन्ही विकेट घेतली. त्यानंतर अनिकेत आणि अमोल कांबळे यांनी चांगली खेळी खेळण्याचा प्रयत्न केला.

दोन षटकं होईपर्यंत 2 बाद 12 धावा अशी राष्ट्रवादी टीमची स्थिती होती. पोलार्डच्या त्यानंतरच्या षटकात मात्र फलंदाजांनी फटके हाणले. तीन षटकं संपल्यांनतर धावफलक 2 बाद 31 वर होता. अमोल कांबळे आणि अनिकेत हे फलंदाजी करीत होते.

प्रवेश आसुदानी यांच्या चौथ्या षटकातही ही फटकेबाजी कायम होती. त्यामुळं शिवसेनेचे गोलंदाज मैदानावर सातत्यानं व्यूहरचना बदलत होते. सतत चर्चा करीत होते. तुषार दलाल यांनी अखेरचं षटक टाकलं. त्यावेळी दोन्ही संघांवरचा दबाव स्पष्ट दिसत होता. अंतिम सामन्यात जाण्यासाठीच्या या संघर्षात पहिला डाव 3 बाद 54 धावांवर आटोपला.

Shivsena Vs NCP
Cricketnama 2023 : राष्ट्रवादीच्या संघाला नमवत काँग्रेसची अंतिम सामन्यात धडक!

शिवसेना (शिंदे गटाने) फलंदाजीसाठी पोलार्ड बाजवा, प्रवेश आसुदानी यांना पाठवलं. सारंग यांनी गोलंदाजीला सुरुवात केली. पोलार्डच्या चौकारानं खेळाला सुरुवात केली. पहिल्या षटकात कोणताही गडी न गमावता शिवसेना 12 धावांवर होती. विशाल खांडेकर यांनी दुसरं षटक टाकलं. त्यावरही प्रवेश आणि पोलार्ड यांनी चांगल्या धावा घेतल्या.

Shivsena Vs NCP
Cricketnama 2023 : सरपंच संघाच्या कडव्या झुंजीनंतर चुरशीच्या सामन्यात शिवसेनेचा विजय!

दुसऱ्या षटकाच्या समाप्तीवेळी 24 धावांवर शिवसेना होती.18 चेंडूत 31 धावांची गरज संघाला विजयासाठी होती. सारंग यांच्या तिसऱ्या षटकातही पोलार्ड ‘फार्मात’ दिसले. काही जोखीमपूर्ण धावाही या जोडीनं घेतल्या. 13 चेंडूत 12 धावा त्यावेळी झाल्या. 12 चेंडूत 6 धावा शिल्लक असताना शिवसेनेच्या (शिंदे गट ) पॅव्हेलियनमध्ये आनंदोत्सव सुरू झाला.

Shivsena Vs NCP
Cricketnama 2023 : अजित पवारांची 'POWER' चालली; 'MNS' संघाला दाखवला बाहेरचा रस्ता!

अनिकेत यानं चौथं षटक सुरू केलं त्यावेळी यष्टीरक्षकानं पोलार्डला बाद केलं. त्यावेळी 1 बाद 49 अशी धावसंख्या होती. 11 चेंडूत 6 धावा शिवसेनेला विजयासाठी हव्या होत्या. पोलार्डनंतर मैदानावर कर्णधार पुरुषोत्तम जाधव आले. ‘नो बॉल’वर त्यांनी पाच धावा मिळविल्या. त्यामुळे शिवसेना 6 गडी राखत विजयी झाली.

सामनावीराचा पुरस्कार पोलार्ड बाजवा यांना ‘सरकारनामा’चे संपादक ज्ञानेश सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नीलेश नातू आणि आकाश मांजरेकर यांनी सामन्याचं सूत्रसंचालन व समालोचन केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com