Shivsena Politics : ताई-दादांच्या भांडणात मुख्यमंत्री बेदखल; पालकमंत्री राठोडांचं चाललंय तरी काय?

Bhavana Gawali Vs Sanjay Rathod : लोकसभा उमेदवारीवरून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्यात वाद उफाळून आला आहे. त्याची प्रचिती म्हणून राठोड यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमालाच दांडी मारली
Bhavana Gawali, Eknath Shinde, Sanjay Rathod
Bhavana Gawali, Eknath Shinde, Sanjay RathodSarkarnama
Published on
Updated on

Washim Political News :

यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यातून विस्तवही जात नाही. ही बाब काल (4 मार्च) पुन्हा उघड झाली. त्यांच्यातील खदखद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उघड झाली. विशेष म्हणजे दोघेही शिवसेनेचे आहेत, तर संजय राठोड यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला ते 'आवर्जून' अनुपस्थित राहिल्याने राठोड मुख्यमंत्र्यांनाही जुमानत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत वाशीममध्ये सोमवारी महिला मेळावा झाला. यात खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) होत्या, पण ज्या जिल्ह्यात कार्यक्रम होता त्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड नव्हते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून (Yavatmal Washim Loksabha Constituency) भावना गवळी यांचं तिकीट निश्चित मानलं जात आहे, तर संजय राठोडदेखील इच्छुक आहेत. गेल्या आठवड्यात पंतप्रधानाच्या उपस्थितीत यवतमाळमध्ये महिला मेळावा झाला. त्याचे आयोजन संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी केले होते. त्यावेळी मागच्या स्थानावर बसलेल्या भावना गवळी यांना पंतप्रधानांनी पुढे बोलावले. त्यावेळी खासदारकीसाठी भावना गवळींचं नाव निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाली होती. तत्पूर्वी 'मेरी झांसी नही दुंगी', असं वक्तव्य भावना गवळी यांनी संजय राठोड यांच्यासंदर्भात केलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhavana Gawali, Eknath Shinde, Sanjay Rathod
Lok Sabha Election 2024 : एकाच आठवड्यात मुख्यमंत्री दुसऱ्यांदा खासदार गवळींच्या मतदारसंघात

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. एकनाथ शिंदे, भावना गवळी आणि संजय राठोड हे तिघेही एकाच पक्षाचे म्हणजेच शिवसेनेचे आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला पालकमंत्री उपस्थित राहणार नसतील तर याचा अर्थ राठोड मुख्यमंत्र्यांनाही जुमानत नाहीत असा होतो, अशी चर्चा सध्या यवतमाळ-वाशीम जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Bhavana Gawali, Eknath Shinde, Sanjay Rathod
PM Modi Yavatmal Visit : भावना गवळी म्हणाल्या माझं तिकीट फायनल, तर संजय राठोड म्हणतात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com