Lok Sabha Election 2024 : एकाच आठवड्यात मुख्यमंत्री दुसऱ्यांदा खासदार गवळींच्या मतदारसंघात

Eknath Shinde : वाशीममध्ये भावना गवळी यांनी आयोजित केलेल्या महिला मेळाव्याला राहणार उपस्थित. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळले होते स्पष्ट संकेत
Eknath Shinde & Bhavana Gawali
Eknath Shinde & Bhavana GawaliSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या वाशीम-यवतमाळ हा मतदारसंघ महायुतीतील भाजपला हवा आहे. यासाठी भाजपकडून प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, भावना गवळी यांनी सहाव्यांदा या मतदारसंघावर दावा करीत, ‘मेरी झांसी नही दूंगी’ असे म्हणत भाजपसह इच्छुकांना प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः भावना गवळी यांनाच उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात सहभागी झालेले मुख्यमंत्री पुन्हा सात दिवसांच्या आतच भावना गवळी यांच्या मतदारसंघात येणार आहेत. गवळी यांनी आयोजित केलेल्या महिला मेळाव्यासह वाशीममधील विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार आहेत. भावना गवळींना उमेदवारी मिळावी, यासाठी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनीच गवळींच्या मागणीला साथ दिल्याची चर्चा यानिमित्ताने वाशीममध्ये सुरू आहे.

शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला म्हणून यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. या वेळची परिस्थिती वेगळी आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे वेगळे झाले. विद्यमान खासदार भावना गवळी यांनी शिंदे यांना साथ दिली आहे. सलग सहव्यांदा वाशीम-यवतमाळ मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी भावना गवळी इच्छुक आहेत. मात्र, भाजपकडून या मतदारसंघावर दावा केला जात आहे. शिंदे गटाला हा मतदारसंघ सोडल्यास या मतदारसंघात संजय राठोड यांच्या नावाचीदेखील चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde & Bhavana Gawali
PM Modi Yavatmal Visit : भावना गवळी म्हणाल्या माझं तिकीट फायनल, तर संजय राठोड म्हणतात...

यवतमाळ-वाशीम मतदारसंघावर भावना गवळी यांनी उघडपणे दावा केला आहे. आपल्या उमेदवारीबाबत वक्तव्य करून गवळी यांनी यवतमाळ-वाशीम मतदारसंघावर आपलाच दावा असल्याचे जाहीरपणे सांगितले. आता भावना गवळी यांच्या या विधानाला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही साथ दिली आहे. त्यामुळे भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोध होत असतानाच आता मुख्यमंत्री शिंदे यांनीही जाहीरपणे पाठिंबा देत भावना गवळी यांनाच उमेदवारी मिळावी, यासाठी पाठिंबा दिला असल्यानेच सात दिवसांच्या आतच मुख्यमंत्री शिंदे पुन्हा खासदार गवळी यांच्या मतदारसंघात उपस्थित राहणार असल्याची चर्चाही आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळमधील दौऱ्याच्या वेळी खासदार गवळी यांच्या उमेदवारीबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राखी बांधणाऱ्या बहिणीला साथ दिली. बचत गटाच्या मेळाव्यात भावना गवळी यांना पुढे बोलाविले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला सात दिवसही होत नाहीत तोच पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावना गवळी यांच्या मतदारसंघात येऊन खासदार गवळी यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. एकीकडे भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोधाची चर्चा होत असतानाच खासदार गवळी यांच्या मतदारसंघात खुद्द मुख्यमंत्री यांनी लक्ष घातल्याने भावना गवळी यांच्यासाठीचे शिंदे पुन्हा मतदारसंघात येणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यमान खासदार भावना गवळी यांना शह देण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. शिंदे गटाला हा मतदारसंघ सुटल्यास या मतदारसंघात शिंदे गटाविरुद्ध लढण्यास ठाकरे गट आग्रही आहे. या मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेस सातत्याने यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढत आहे.

Eknath Shinde & Bhavana Gawali
भावना गवळी बांधावर पोहोचल्या ; शेतकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली| Bhavana Gawali |

यवतमाळ-वाशीम मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. या मतदारसंघातील शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी असल्यामुळे यवतमाळ-वाशीम हा शिवसेनेचा गड शाबूत असल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे. भावना गवळी आणि संजय राठोड यांना रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून प्लॅन आखण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यास शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मतदारसंघावर विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Eknath Shinde & Bhavana Gawali
Narendra Modi On Bhavana Gawali: मोदींची 'बहिणी'ला हाक....; भावना गवळींच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com