Shivsena Shinde News : ठाकरेंच्या शिवसेनेत जयस्वाल आणि तुमानेंना मान होता, ते येवढे लाचार ते कधीच झाले नाहीत !

Nagpur : पारशिवनी येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा होता.
Krupal Tumane and Ashish Jaiswal
Krupal Tumane and Ashish JaiswalSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Group's MP and MLA News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काल (ता. ११) नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि मौदा तालुक्याचा दौरा होता. दरम्यान पारशिवनी येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा होता. येथे भाजपचे नेते रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी रामटेकचे विद्यमान आमदार ॲड. आशिष जयस्वाल आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचा चांगलाच पाणउतारा केला. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis visited Ramtek and Mauda talukas)

२०१९मध्ये पक्षाने मला विधानसभेची उमेदवारी दिली. पण आमदार आशिष जयस्वालांनी तेव्हा भाजपची सीट पाडली. तेव्हा भाजप-शिवसेना युती असताना जयस्वाल निवडणुकीला का उभे राहिले? भाजपच्या उमेदवाराला का पाडले, असे प्रश्‍न रेड्डी यांनी केले. आमदार जयस्वाल भाजप-सेना युतीच्या सध्याच्या सरकारमध्ये आहेत. पण आमच्या भाजपच्या मेळाव्यात ते कशासाठी आले आणि मंचावर बसले, असा थेट सवाल रेड्डींनी केला.

जयस्वालांनी महाविकास आघाडीला अडीच वर्ष साथ दिली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोबत ते राहिले. नंतर आपल्यासोबत आले. कशासाठी आले? ते काही भाजपचे काम करण्यासाठी आले का? तर नाही... तर केवळ मंत्रिपद पाहिजे म्हणून आले. कमळाच्या चिन्हावर लढत असलेला माणूस जर आपल्या मंचावर बसत असेल, तर हे मला मान्य नाही, असे खडे बोल रेड्डींनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आणि त्यानंतर मंचावरून खाली उतरून ते कार्यकर्त्यांमध्ये जाऊन बसले.

आमदार खासदारांची लाचारी कशासाठी ?

मूळ शिवसेनेत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असताना आशिष जयस्वाल आणि कृपाल तुमाने यांना मोठा मान होता. पण एकनाथ शिंदे यांच्या सेनेत गेल्यानंतर त्यांच्यावर लाचारी करण्याची वेळ आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्हा दौऱ्यातील एकाही कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांना नव्हते. मग आमदार आणि खासदार आमच्या मेळाव्यात बिना बोलावता कशासाठी आले, असा सवाल भाजपच्या एका आमदारांनी केला.

Krupal Tumane and Ashish Jaiswal
Cm Eknath Shinde In Kashmir News : मुख्यमंत्री शिंदे कुटुंबासह काश्मिर दौऱ्यावर, `महाराष्ट्र भवन` उभारण्यासाठी जागा मागितली..

हे तर होणारच होते..

आम्ही त्यांना कधीही आमच्या पक्षाच्या कार्यक्रमात बोलावत नाही. तरीही ते बिना बोलावता येतात. आल्यावर एक आमदार आणि खासदार म्हणून त्यांना मान द्यावा लागतो. पण आमच्या कार्यक्रमात न बोलवता त्यांचे येणे हे प्रत्येकालाच रुचणारे नाही.

माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांना ते रुचले नाही अन् त्यांनी आमचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यासमोरच जयस्वाल आणि तुमानेंना खडे बोल सुनावले. न बोलावता त्यांनीही येऊ नये, असे आमदारांनी नाव प्रसिद्ध न होऊ देण्याच्या अटीवर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) एका नेत्याला खासगीत सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com