Karyakarta Hunkar Melava: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. शिवसेना आणि अपक्ष मिळून ५० आमदार शिंदेंसोबत गेले. त्या पाठोपाठ खासदारही शिंदेंसोबत गेले. त्यामध्ये यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांचाही समावेश होता. (Washim MP Bhavana Gawli was also included)
भावना गवळींनी केलेली गद्दारी शिवसैनिक विसरलेले नाहीत आणि २०२४च्या निवडणुकीत गवळींना धडा शिकवण्याचा विडा शिवसैनिकांनी उचलला आहे. संजय राठोडसुद्धा शिंदे गटात गेले. त्यानंतर माजी राज्यमंत्री संजय देशमुख सक्रिय झाले आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश घेतला आणि राठोडांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झाले. आता खासदार गवळींना धडा शिकवण्यासाठी लोकसभा लढण्याचीही त्यांची तयारी आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघासाठी इच्छुक उमेदवारांनी स्वतः इच्छा व्यक्त केली आहे. भावना गवळी यांच्या विरोधात लढण्यासाठी माजी मंत्री संजय देशमुख आणि पोहरा देवी गडाचे महंत सुनील महाराज इच्छुक आहेत, स्वतः सुनील महाराजांनी इच्छा व्यक्त केली आहे.
दिग्रस मतदार संघातून संजय देशमुख आमदार होते, त्यांनी २००२ ते २००४ या काळात मंत्रिपद भूषवलेलं आहे. काँग्रेसमध्ये असताना संजय देशमुख यांनी आता शिंदे गटात असणाऱ्या संजय राठोड यांचा तेव्हा पराभव केला होता. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर संजय देशमुख आणि महंत सुनील महाराज यांनी ठाकरेंना पाठिंबा दिला आहे.
भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या विरोधात लढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आदेश दिला तर मी नक्की लढेन, असं महंत सुनील महाराज म्हणाले आहेत. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजाचे मतदान निर्णायक ठरते. त्यामुळे महंत सुनील महाराज यांनी लोकसभा लढण्याची तयारी चालवली आहे. उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा दिल्यास ते येथून लढणार, हे निश्चित.
भाजप-शिवसेना युती असताना यवतमाळ-वाशीम हा लोकसभा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला होता. आता महाविकास आघाडीतही (Mahavikas Aghadi) तो शिवसेनेच्या (Shivsena) वाट्याला येईल, असा अंदाज लावला जात आहे. असे झाल्यास महंत सुनील महाराज की संजय देशमुख, ही चर्चा रंगली आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.