Tukdoji Maharaj : राष्ट्रसंतांपुढं नतमस्तक होताना नेतेही विसरले आपसातील वैरभाव

Tribute to Rashtrasant : पुण्यतिथीला वाहिली मौन श्रद्धांजली
Tukdoji Maharaj Samadhi
Tukdoji Maharaj SamadhiSarkarnama
Published on
Updated on

Expression of Emotions in Amaravati District : ग्रामगीता आणि आपल्या अविस्मरणीय कार्यातून जगविख्यात झालेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत लाखों गुरुदेव भक्तांनी मौन श्रद्धांजली अर्पण केली. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे गुरुवारी (ता. २) मौन श्रद्धांजलीचा हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला सर्वच जाती धर्माचे, राजकीय पक्षांचे लोक सर्व मर्यादा बाजूला ठेवत उपस्थित राहतात. गुरुवारीही गुरुकुंज मोझरीत असेच चित्र बघायला मिळाले.

अमरावतीच्या लोकसभा खासदार नवनीत राणा, राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, तिवसा मतदारसंघाच्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, अकोल्याचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी, आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह सर्वच पक्षातील वरिष्ठ नेते, गुरुदेव भक्त या वेळी प्रामुख्यानं उपस्थित होते. श्रद्धांजली कार्यक्रमादरम्यान सर्वधर्मीय प्रार्थनाही म्हणण्यात आल्या. देशभरातील सुमारे तीन लाख गुरुदेव भक्त या कार्यक्रमात सहभागी झाले होते. (Silence tribute to Rashtrasant Tukdoji Maharaj on his death anniversary at Mozri in Amravati district)

खासदार नवनीत राणा आणि अॅड. यशोमती ठाकूर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून ‘कोल्डवॉर’ सुरू आहे. प्रकरण अगदी विधानसभेत हक्कभंग आणण्यापर्यंत गेलं आहे. या दोन्ही नेत्या व त्यांचे समर्थक अत्यंत शांतपणे गुरुकुंज मोझरीत पूर्णवेळ उपस्थित होते. भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे व राणा दाम्पत्यातही फारसं सख्य नाही. मात्र, श्रद्धांजली स्थळी त्यांच्या चेहऱ्यावरही कोणतेही वैरभाव दिसत नव्हते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अकोला जिल्ह्यातून कार्यक्रमासाठी मोझरीत आलेले आमदार अमोल मिटकरी यांनी अलीकडच्या काळात भाजपबद्दल आक्रमकपणे बोलणं बंद केलं. तेदेखील अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर. असं असलं तरी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अकोल्यात झालेल्या आरोग्य शिबिरावरून त्यांचं आणि स्थानिक भाजप नेत्यांचं वाजलंही होतं. परंतु आज आमदार मिटकरी पूर्णपणे गुरुमय झालेले दिसले. तसेही ते कायमच ग्रामगीतेचा आपल्या भाषणांमध्ये उल्लेख करीत असतात. एकमेकांना सातत्यानं पाण्यात पाहणाऱ्या या राजकीय मंडळींनाही एकाच सूत्रानं वैरभाव विसरायला गुरुवारी भाग पाडलं, ते म्हणजे राष्ट्रसंतांची शिकवण.

अशी वाहतात श्रद्धांजली

गुरुकुंज मोझरीतील पुण्यतिथी महोत्सवातील सर्वांत महत्त्वाचा क्षण असतो तो मौन श्रद्धांजलीचा. दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सगळे गुरुदेव भक्त स्तब्ध उभे राहतात. दोन्ही हातांची घडी असते. यावेळेस महाद्वारावरील विशालकाय घंटेचा निनाद झाल्यावर महासमाधीच्या दिशेने भाविक जेथे असेल तेथे दोन मिनिटे थांबून हात जोडून मौन श्रद्धांजली अर्पण करतात.

(Edited by : Prasannaa Jakate)

Tukdoji Maharaj Samadhi
Amravati Division News : एकजुटीअभावी बारगळले अमरावती डिव्हिजनचे स्वप्न; उत्तर भारतातील कंपनी बांधणार मॉल?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com