बालेकिल्ला काबीज करण्यासाठी स्नेहमीलनाने 2024 च्या विधानसभेची तयारी?

या प्रश्नाचे उत्तर टाळणाऱ्या त्या स्वयंघोषित नेत्याचे भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्यासोबतचे BJP's Union Minister विमानातील फोटो समाजमाध्यमांतून झळकले होते.
Yavatmal Map
Yavatmal MapSarkarnama

यवतमाळ : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला अद्याप बराच कालावधी शिल्लक आहे. कारण विरोधकांकडून सरकार पाडण्याचा आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत आणि ‘जुने मित्र’ पुन्हा एकत्र येण्याच्या सर्व शक्यता मावळल्यागत दिसत आहेत. त्यामुळेच की काय एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ स्नेहमीलनातून काबीज करण्याचे प्रयत्न नेत्यांकडून सुरू झालेले आहेत, असे म्हणता येते.

ऑक्टोबर 2024 मध्ये मुदत संपणार आहे. पण निवडणुकीच्या तयारीला आत्तापासूनच सुरुवात झाली असे म्हणणे सयुक्तिक नसले तरी ते वास्तव आहे. ‘स्नेहमीलन’ कार्यक्रम ही त्याचीच नांदी आहे. दोन महिन्यांपूर्वी एका दानशूर व्यक्तीने पत्रकार परिषद घेऊन आपण यवतमाळ विधानसभेची निवडणूक लढणार हे जाहीर केले होते. त्यानंतर 'स्नेहमीलन' कार्यक्रम झाला. गरीबच आपले मतदाते असतील. रोज आपण हजारो लोकांना अन्नछत्र पुरवितो. गोरगरिबांना मदत करतो. तरीदेखील अधिकारी दखल घेत नाहीत. गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी़ ‘आमदार’ बनणे आवश्यक आहे. त्यासाठीच आपण निवडणूक लढणार आहे, असा युक्तिवाद करीत त्यांनी आपल्या खासगी कार्यालयाचे उद्घाटन केले. हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असताना आपण कोणत्या पक्षाकडून लढणार, या प्रश्नाचे उत्तर टाळणाऱ्या त्या स्वयंघोषित नेत्याचे भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्यासोबतचे विमानातील फोटो समाजमाध्यमांतून झळकले होते.

किमान यावरून 2024 ची तयारी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. यवतमाळ विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. अधूनमधून तो भाजपच्या ताब्यात गेला, ही खंत काँग्रेस नेत्यांना आहे. त्यामुळे यावेळी वेळेवर तयारी न करता आतापासूनच बांधणी केली जात आहे. उमेदवार कोण असेल, याची चाचपणी सुरू झाली आहे. तर काँग्रेसच्या एक राज्यस्तरीय नेत्याने आयोजित केलेला ‘स्नेहमीलन’ समारंभसुद्धा विधानसभा निवडणुकीची नांदीच आहे. महाराष्ट्राला 11 वर्षे मुख्यमंत्री देणाऱ्या वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांचे कर्तृत्व समोर ठेवून पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे संकेत आहेत.

काँग्रेस त्यासाठी सक्षम बंजारा नेतृत्वाच्या शोधात आहे. मोठ्या संख्येत असलेल्या बंजारा समाजाकडे काँग्रेसने दुर्लक्ष केल्याचा आरोप खोडून काढायचा आहे. त्यादृष्टीने काँग्रेसची वाटचाल दिसते आहे. तर यवतमाळ शहरावर ज्यांचा राजकीय वरदहस्त आहे, ज्यांचा शब्द प्रमाण मानला जातो, अशा काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने यासाठी पुढाकार घेतला आहे. आमदार कोणीही असला तरी त्यांना शहरावर आपली सत्ता व काँग्रेसमध्ये आपला दबदबा हवा आहे. त्यांच्या व भाऊंच्या मार्गदर्शनात मोट बांधली जात आहे. भाऊंचेही यात हितच आहे. त्यांनीही दिग्रसवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. 'स्नेहमीलन' कार्यक्रम हे त्यासाठी निमित्त ठरणार आहे.

Yavatmal Map
स्वबळावर लढल्याशिवाय काॅंग्रेस कार्यकर्ता टिकणार नाही : नानांचा हट्ट कायम

काँग्रेसची शक्ती कमी करण्यासाठी विरोधकांनी ‘अपक्ष’ समोर करून आव्हान उभे केले आहे. यवतमाळ मतदारसंघ आलटून पालटून नेतृत्व बदलत असते. यावेळी महागाई, दुर्लक्षित शेतकरी, वाढलेली बेरोजगारी व ढासळलेली अर्थव्यवस्था याचे चटके जनता सहन करीत आहे. तर, विकासाच्या नावाखाली शहराची लागलेली वाट, नगरपालिकेतील सत्ताधारी-विरोधकांमधील असमन्वय, विकासाने बेजार झालेली जनता याचा परिणाम 2024 च्या निवडणुकीत दिसणार असल्याची चर्चा रंगत आहे. हे मुद्दे 'कॅश' करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होणार असल्याचे दिसते आहे. एकूणच यवतमाळ विधानसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com