स्वबळावर लढल्याशिवाय काॅंग्रेस कार्यकर्ता टिकणार नाही : नानांचा हट्ट कायम

प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची `सरकारनामा`ला (Sarkarnama) खास मुलाखत
Congress Leader Nana Patole
Congress Leader Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

पुणे : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत राज्यातून काॅंग्रेसचे 25 खासदार निवडून आणण्याचा माझा संकल्प आहे. मी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा वगैरे काही नाही. पक्षसंघटना देईल ती जबाबदारी मी स्वीकारेल, असा मनोदय काॅंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केला.

राज्याच्या कानाकोपऱ्यात पक्षाच्या विचारांची लोक आहेत. 2024 पर्यंत कॉग्रेसला राज्यात सर्वात मोठा पक्ष करायचा आहे. ज्यावेळी मी हे बोललो तेव्हा आमची गंमत केली गेली. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत लोकांच्या मते आणि कौल दिसल्याचे त्यांनी `सरकारनामा`ला दिलेल्या मुलाखतील स्पष्ट केले.

पुढच्याही निवडणुकीत चांगला निकाल दिसणार असून भाजपला राज्यातुन हद्दपार करणार असल्याचा निर्धार केला असल्याचे त्यांनी जाहीर केले. महाराष्ट्रात काॅंग्रेस पक्ष आपल्या पद्धतीने कामाला लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही स्वबळावर लढलो. स्थानिक आघाड्या आणि युती यामुळे काॅंग्रेसचे मोठे नुकसान झाले. काॅंग्रेस कार्यकर्ता टिकवायचा असेल तर स्वबळाशिवाय पर्याय नाही. तसे पक्षश्रेष्ठींनी मला सांगितले आहे, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. मी स्वतःला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार वगैरे काही मानत नाही. पुढे काय परिस्थिती येईल ते पुढे पाहिले जाईल. भाजपला हद्दपार करणे हे प्रथम ध्येय आहे. महाराष्ट्रातून काॅंग्रेसचे 25 खासदार निवडून आणण्याचा माझा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Congress Leader Nana Patole
राज्यात पडणाऱ्या छाप्यांमागे देवेंद्र फडणवीसच! : नाना पटोलेंचे गंभीर आरोप

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भंडारा-गोंदियामध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी तुमचे जमते का या प्रश्नावर ते म्हणाले की स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे आम्ही तेथेही स्वबळावर असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.

भाजप सोडलेल्या किंवा भाजपविरोधी पक्षात असलेल्या नेत्यांवर कारवाई केली जाते. तुम्हाला ईडीची नोटीस आली नाही का, या प्रश्नावर माझ्याबाबतीत प्रयत्न झाले पण माझे घर काचेचे नाही. मी काही संस्थानिक नाही. त्यामुळे ते माझ्यावर काय कारवाई करणार? मी कोणाला दबणारा माणूस नाही हे त्यांना पण माहिती असल्याचे पटोलेंनी नमूद केले.

Congress Leader Nana Patole
पवारांप्रमाणे मुख्यमंत्र्यांना का भेटत नाही? : नानांनी केला उलगडा

देगलूर पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला तर, देवेंद्र फडणवीस `करेक्ट कार्यक्रम` करतील असे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटल आहे, यावर ते म्हणाले की देगलूरमध्ये `करेक्ट कार्यक्रम` भाजपचाच होणार आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या त्यामुळे आम्हाला तेथे पराभव पत्कारावा लागला. मात्र, आता त्या चुका आम्ही सुधारल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com