Raj Thackeray in Nagpur: ''...म्हणून मनसे वाढत असताना त्रास होणारच!''; राज ठाकरेंचा टीकेचा रोख नेमका कुणाकडे?

Raj Thackeray : काही दिवसांनी हे पोट्टंच तुमच्यावर वरवंटा फिरवेल...
raj thackeray
raj thackeraysarkarnama

Raj Thackeray News: ज्यांना हसायचं असेल तर त्यांनी हसावं. तुम्ही घट्ट पाय देऊन उभे राहा. कालांतराने त्यांच्या लक्षात येईल हे मोठे झाले. यांचे आमदार, खासदार, नगरसेवक निवडून येऊ लागले आहेत. काही जणांनी इतके वर्ष पक्षांची दलाली केली असेल, तर त्यांना दुसरा पक्ष वाढत असताना त्रास होणारच आहे अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोला लगावला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे एकदिवसीय नागपूर दौर्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, सर्वच राजकीय पक्ष यश अपयशाच्या प्रक्रियेतून जात असतात. कालांतराने मतदार त्याच त्याच लोकांना कंटाळतात. आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून लोकं म्हणतील हे पोट्टं काय करणार? मात्र, काही दिवसांनी हे पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवेल असेही राज ठाकरे यांनी सुनावले.

raj thackeray
Pimpri-Chinchwad : पिंपरी पालिकेत चाललंय काय? कर्मचाऱ्यांच्या शिस्तीसाठी १६ वर्षात दहा शिस्तीचे आदेश

गेल्यावेळी मी दौऱ्यावर आलो, तेव्हा मनसेला पदाधिकारी मिळत नाही अशा बातम्या आल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अंजन घालावं यासाठी पदाधिकाऱ्यांना आज पत्रवाटप करण्यात आले आहे. काही पत्रकार एखाद्या पक्षासाठी वाहलेले असतात. काही जणांनी इतके वर्ष पक्षांची दलाली केली असेल, तर त्यांना दुसरा पक्ष वाढत असताना त्रास होणारच आहे. मात्र, नागपूरमधील काही पत्रकार मनसेला प्रोत्साहन देत आहेत, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली.

raj thackeray
Saroj Ahire Speech in Vidhan sabha : सावरकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रवादीच्या आमदार आग्रही : शिंदे-फडणवीसांना घातले साकडे

आजचा काळ पाहिला तर यांना हवंय काय? असं वाटतं. सर्व गोष्टी लवकर हव्यात. वडा टाकला की लगेच तळून यायला पाहिजे. मनसेच्याही वाट्याला यश आलं. अपयश आलं. पण आपण खचलो नाही. मी खचणार नाही. ज्या घरात होतो तिथे अनेक पराभव पाहिले. पराभूत झाल्याने रडणारी माणसे पाहिले. मी कसा खचणार? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com