Pimpri-Chinchwad : पिंपरी पालिकेत चाललंय काय? कर्मचाऱ्यांच्या शिस्तीसाठी १६ वर्षात दहा शिस्तीचे आदेश

Pimpri-Chinchwad News : आता तरी कार्यालयीन शिस्त पाळली जाणार का?
Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwad Sarkarnama

पिंपरी : अत्यंत प्रामाणिक आणि तडफदार डॉ.श्रीकर परदेशी यांचा आयुक्तपदाचा कार्यकाळ सोडला, तर पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेत कर्मचारीच नाही, तर काही अधिकारी सुद्धा शिस्त पाळत नसल्याचे गेल्या १६ वर्षातील निरीक्षण आहे.

त्यामुळे नवे आयुक्त शेखरसिंह यांना कार्यालयीन शिस्तीबाबत व तिचा भंग केल्यास कारवाईचा इशारा देणारा आदेश (परिपत्रक) नुकताच नव्याने काढण्याची पाळी आली आहे. त्यामुळे आता तरी कार्यालयीन शिस्त पिंपरी पालिकेत पाळली जाणार की येरे माझ्या मागल्या... म्हणीचाच पुन्हा प्रत्यय येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (Pimpri Chinchwad Municipal Corporation)

कर्मचारीच नाही, तर अधिकारीही कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित नसणे, त्यांनी ओळखपत्र न लावणे, वर्ग तीन व चारचे कर्मचारी गणवेषात नसणे या कार्यालयीन बेशिस्तीच्या काही ठळक बाबी फिरत्या पथकाने आयुक्तांच्या निदर्शनास आणल्याने त्यांना शिस्तीबाबतचा आदेश पुन्हा नव्याने जारी करावा लागला आहे. २००६ पासून आयुक्तांनी याबाबत काढलेला हा दहावा आदेश आहे.

Pimpri-Chinchwad
Winter Session 2022 : नगरमध्ये जबरदस्तीने धर्मांतर: राम सातपुतेंच्या लक्षवेधीने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

त्यानंतरही काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेशिस्त वर्तन सुरुच आहे, हे विशेष. कारण ज्यांच्यावर शिस्त लावण्याची व बेशिस्तांवर कार्यवाही करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते विभागप्रमुखच ती ते पार पडत नसल्याचे वा त्यात टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले आहे.

वर्ग तीन व चारच्या पालिका कर्मचाऱ्यांनी गणवेशात असणे आवश्यक आहे. मात्र, ते तसे राहत नसल्याने पालिका सेवक कोण आणि नागरिक कोण हेच समजूत येत नव्हते व नाही. परिणामी २००९ ला तत्कालीन आयुक्तांनी विनागणवेषातील कर्मचाऱ्याला विभागप्रमुखांनी वीस रुपये दंड करण्याचा आदेश काढला होता.

Pimpri-Chinchwad
Rahul Shewale : राहुल शेवाळेंचा लेटरबाँम्ब : मनिषा कायंदेंकडून ब्लॅकमेलिंग ?

तर हा दंड न करणाऱ्या विभागप्रमुखाला पन्नास रुपये दंड आकारण्यात येणार होता. मात्र १३ वर्षानंतर त्याला हरताळच फासला जात असल्याचे आढळल्याने १६ डिसेंबर २०२२ ला आयुक्तांना शिस्तीबाबत पुन्हा नव्याने आदेश जारी करण्याची पाळी आली आहे. त्यानुसार बेशिस्त कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आठवण विभागप्रमुखांना पु्न्हा करून देण्यात आली आहे. १२ विविध प्रकारच्या कार्यालयीन शिस्तीचे पालन झाले नाही, तर आता विभागप्रमुखांवरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

Pimpri-Chinchwad
वैदकीय महाविद्यालयात १ कोटींच्या भंगारावर दरोडा; शशिकांत शिंदेंचा रोख नक्की कोणाकडे?

पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यालयात नागरिकांना सुरक्षारक्षक हे मुक्त प्रवेश देत असल्याबद्दलही आयुक्त तथा प्रशासकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रजिस्टरमध्ये नोंद करून आणि गेटपास देऊनच नागरिकांना प्रवेश द्यावा, तर पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ओळखपत्राशिवाय तो देण्यात येऊ नये, असे सुरक्षारक्षकांना आता बजावण्यात आले आहे.

कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित नसणारे ओळखपत्र न लावणारे अधिकारी आणि कर्मचारी आणि गणवेषात नसलेले सेवक यांच्यावर कारवाई करण्यास विभागप्रमुखांना नव्याने सांगण्यात आले आहे. तसेच त्यांना आपल्या हाताखालील अधिकाऱी आणि कर्मचाऱ्यांच्या हजेरी नियमित तपासून त्याचा अहवाल दर महिन्याला प्रशासन विभागाला सादर करण्यास बजावण्यात आले आहे. (Pimpri-Chinchwad News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com