Vidarbha Politics : ...म्हणून नागपुरात आदिवासी महिलांनी अडवली मंत्र्याची कार; पोलिसांची धावपळ

Vijaykumar Gavit News : मंत्र्यांच्या वाहनासमोर अचानक जमाव जमल्याने गावित यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांची पळापळ...
Vijaykumar Gavit News
Vijaykumar Gavit NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Politics : आदिवासी समाजाला भेटण्यासाठी आलेले मंत्री विजयकुमार गावित यांचे वाहन अडवित नागपुरातील आदिवासी महिला घरकुलाच्या प्रश्नावर अचानक आक्रमक झाल्याने संविधान चौकात तैनात पोलिसांची बुधवारी चांगलीच धावपळ झाली.

नागपुरात संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळाला आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी भेट दिली. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातील आरक्षण देण्यात येऊ नये, अशी मागणी समितीने या वेळी केली.

Vijaykumar Gavit News
Kalyan Dombivli MNS News : फेरीवाल्यांना मारहाण करणं मनसैनिकांना भोवलं; सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल

समितीशी चर्चा केल्यानंतर गावित यांनी त्यांना लेखी आश्वासनही दिले. चर्चा पूर्ण झाल्यानंतर गावित आपल्या शासकीय वाहनाने रवाना होण्याच्या तयारीत होते. अशात अचानक महिलांनी त्यांच्या वाहनाला घेराव घातला. आदिवासी समाजातील घरकुलाच्या मुद्द्यावर तोडगा काढावा, अशी मागणी या महिलांनी केली.

मंत्र्यांच्या वाहनासमोर अचानक जमाव जमल्याने येथे गावित यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांची चांगलीच धावाधाव झाली. आदिवासी समाजातील सर्वच प्रश्नांवर तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही गावित यांनी दिल्यानंतर जमलेल्या महिला शांत झाल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, सदस्य शांता कुमरे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष दिनेश शेराम, ट्रायबल ऑफिसर फोरमचे अध्यक्ष एम. आत्राम, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांचे मानद सचिव संदीप जोशी या वेळी उपस्थित होते.

यासंदर्भात नागपूर शहर पोलिसांशी संपर्क साधला असता,आंदोलनस्थळी जमलेल्या नागरिकांना गावित यांच्याशी चर्चा करायची होती. त्यामुळे ते त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आले होते. मंत्र्यांना घेराव, नारेबाजी किंवा कोणताही आक्रमक प्रकार घडला नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

काय म्हणाले गावित?

मंत्री गावित म्हणाले, आदिवासींच्या आरक्षणामधून अन्य कुणालाही आरक्षण (Reservation) देण्यात येणार नाही. नागपुरातील सुराबर्डी येथे गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय उभारण्यात येईल. हिवाळी अधिवेशन काळात या संग्रहालयाचे भूमिपूजन करण्यात येईल. गडचिरोली येथील आदिवासी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी गृह विभागाला विनंती करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Vijaykumar Gavit News
Satara BJP News : सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत बावनकुळेंचे महत्त्वपूर्ण विधान; भाजप की, घटक पक्ष...?

शासकीय वसतिगृहात भोजनावळ पूर्ववत सुरू करण्यात येईल. शबरी आवास योजनेतून आदिवासींना जास्तीत-जास्त घरकुले बांधून देण्यात येतील. त्यासाठी १.२५ लाख घरकुलांची उभारणी करण्याचे नियोजन करण्यात येईल. शहरी भागांमध्येही आदिवासी योजनेतून घरकुलांचे बांधकाम करण्यात येईल. गरज तिथे आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृह सुरू करण्यात येतील, असे मंत्री गावित यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Vijaykumar Gavit News
Kalyan Dombivli MNS News : फेरीवाल्यांना मारहाण करणं मनसैनिकांना भोवलं; सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com