अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना एक निनावी धमकीच पत्र आल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रातून त्यांना सतक्र राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हे हत्या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने त्यांना हे धमकीचं पत्र आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र कितीही धमक्या आल्या तरी आपण घाबरणार नाही, लढत राहणार अशी प्रतिक्रिया दिली आहे.
२१ जून २०२२ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास उमेश कोल्हे (वय ५५) हे दुकान बंद करून घराकडे जात असताना शहरातील न्यू हायस्कूल मेन शाळेसमोरील गल्लीत दोघांनी गळ्यावर व शरीरावर वार करून त्यांची हत्या केली. नऊ दिवसांपर्यंत पोलिस हत्येचे कारण शोधूच शकले नाही. २ जुलै पर्यंत कोल्हे हत्या प्रकरणात सात संशयीत आरोपींना अटक करण्यात आली होती.
दरम्यान दोन महिन्यांपूर्वीही खासदार नवनीत राणा यांना धमकी देण्यात आली होती. एका मुस्लिम धर्मगुरूने फोन कॉल वरुन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण केल्यास तुम्हाला ठार मारू, अशी धमकी देण्यात आली होती. तसेच, काही वर्षांपूर्वी एका अज्ञाताने नवनीत राणा यांच्यावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर गेल्या वेळी शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर धमकीचे पत्र असल्यामुळे राजकीय वर्तुळातही या चर्चांना उधाण आले होते. मात्र या धमकीच्या पत्रात कोणत्याही नेत्याचे नाव मात्र नव्हते. मात्र, नवनीत राणांनी या लेटरहेडवरुन शिवसेनेनंच धमकी दिल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली होती. शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या इशाऱ्यावर ही धमकी पाठवल्याचा दावा त्यांनी राणांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.