Bhandara Sarkarnama Impact : ‘न्यूड डान्स’ प्रकरणी गोबरवाहीतील पोलिस निलंबित

SP Lohit Matani : एसपींनी यंत्रणेला खडसावले, चुकीचा प्रकार खपवून घेणार नाही
Bhandara Sarkarnama Impact : ‘न्यूड डान्स’ प्रकरणी गोबरवाहीतील पोलिस निलंबित
Published on
Updated on

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी मंडईमध्ये तरुणीला पूर्ण विवस्त्र करवित नृत्य प्रकरण गोबरवाही पोलिसांना चांगलेच भोवले आहे. यासंदर्भात केवळ ‘सरकारनामा’ने वृत्त प्रकाशित करताच पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी दोन पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले आहे. या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांची नाकाडोंगरी येथील मंडईत बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु घटनेच्या वेळी दोघेही गैरहजर होते.

बंदोबस्त असताना गैरहजेरी, कर्तव्यात कसूर असा ठपका ठेवत अधीक्षक मतानी यांनी दोन्ही पोलिसांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळं जिल्ह्यातील पोलिस दलात खळबळ उडाली आहे. (SP Lohit Matani Of Bhandara Suspended Two Policemen's In Case Of Nude Dance In Nakadongari of Tumsar After Sarkarnama News)

Bhandara Sarkarnama Impact : ‘न्यूड डान्स’ प्रकरणी गोबरवाहीतील पोलिस निलंबित
Bhandara : एका कार्यक्रमात सभापतीनं पैसे उधळले, दुसऱ्यात मुलीला पूर्ण विवस्त्र नाचवले

पोलिस हेड कॉस्टेबल राकेश सिंग सोलंखी आणि कॉस्टेबल राहुल परतेकी असे निलंबित करण्यात आलेल्या दोन पोलिसांची नावे आहेत. या कारवाईनंतर पोलिस अधीक्षक मतानी यांनी संपूर्ण जिल्ह्यातील यंत्रणेला खडसावले आहे. आपण भंडारा येथे असेपर्यंत कोणताही अनुचित प्रकार खपवून घेणार नाही, अशा कडक शब्दात त्यांनी सर्वांना ताकीद दिली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अद्यापही मंडईचे कार्यक्रम सुरू आहेत. त्यामुळं तेथे तैनात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अत्यंत गंभीरतेनं काम करावं, असा इशारा त्यांनी दिला.

तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथ शनिवारी (ता. १८) डान्स हंगामाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नागपूर येथून आर. के. डान्स हंगामा पार्टीच्या नृत्यांगनांना बोलावण्यात आलं होतं. मध्यरात्री दोनच्या सुमारास नृत्य करणारी तरुणी विवस्त्र झाली. त्यानंतर तिच्यासोबत असलेल्या तरुणाने तरुणीसोबत भर व्यासपीठावर अश्लील कृत्यही केले. सुमारे पाऊण तासापर्यंत हा धिंगाणा सुरू होता. मंडईनंतर व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली. सध्या या प्रकरणाची चर्चा संपूर्ण भंडारा जिल्ह्यात सुरू आहे.

गोबरवाही पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. नाकाडोंगरीतील या प्रकाराबद्दल ‘सरकारनामा’ने वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर तातडीनं अधीक्षकांनी दोन पोलिसांना निलंबित केलं. मतानी जिल्ह्यात रूजू झाल्यापासून त्यांनी भंडाऱ्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अत्यंत कठोरतेनं हाताळली आहे. अनेक गुन्हेगारांवर त्यांनी वचक निर्माण केला आहे. कम्युनिटी पोलिसिंगवरही ते भर देत आहेत. पोलिसांच्या परिवाराचीही काळजी घेत आहेत. मात्र कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना पाठिशी घालणार नाही, याचा प्रत्यय त्यांनी पुन्हा एकदा ही कठोर कारवाई करीत दिला आहे.

अख्खं पोलिस ठाणं होतं निलंबित

नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे एका सरपंचानं अशाच कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळीही ‘न्यूड डान्स’चा प्रकार घडला होता. अशात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत संपूर्ण पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबन कारवाईला सामोरं जावं लागलं होतं.

Edited by : Prasannaa Jakate

Bhandara Sarkarnama Impact : ‘न्यूड डान्स’ प्रकरणी गोबरवाहीतील पोलिस निलंबित
Bhandara SP's Initiative : वर्दीत गुंडांना पळता भुई थोडी करतो, अन् केबिनबाहेर लोकांच्या डोक्यावर हात ठेवतो…

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com