ST bus caught fire : वायरींग जळल्याने एसटी बस पेटली; धावपळीत प्रवासी जखमी !

Ner : नेर शहरातून जात असताना अचानकपणे बसच्या वायरींग ने पेट घेतला.
ST bus caught fire
ST bus caught fireSarkarnama

ST bus caught fire in Ner : पुसद आगाराची बस आज दुपारी साडेबाराच्या सुमारास नेर शहरातून जात असताना अचानकपणे बसच्या वायरींग ने पेट घेतला. त्यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. घाई गडबडीत बसमधून बाहेर पडताना काही प्रवासी जखमी झाले. (Some passengers were injured while exiting the bus)

पुसद (Pusad) आगाराची बस क्रमांक एम.एच. ०७ सी. ९४३८ ही पुसदवरून अमरावतीकडे (Amravati) जात होती. दरम्यान नेर आगारातून प्रवासी घेऊन बस पुढे निघाली असता स्थानिक पूर्णिमा लॉजसमोर या गाडीत अचानकपणे धूर निघाला. गिअर बॉक्स नजीक गाडीने पेट घेतला. मोठ्या प्रमाणात धूर निघाल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

एकाच वेळी बसमधून बाहेर पडण्यासाठी धावपळ झाली. या धावपळीत काही प्रवासी जखमी झाले. तात्काळ पाणी टाकत आग विझवण्यात आल्यामुळे कुठलाही अनर्थ झाला नाही. बसमधून धूर निघू लागताच प्रवाशांमध्ये धावपळ झाली पण चेंगराचेंगरी झाली नाही. त्यामुळे कुणीही गंभीर जखमी झाले नाही आणि वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे इतरही कुठली हानी झाली नाही.

भंगार गाड्यांचा प्रश्न गंभीर...

अलीकडे एसटीच्या आगारांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या मोडकळीस आलेल्या भंगार गाड्या आहेत. गाड्यांचे मेंटेनन्स बरोबर नसल्याने प्रवासादरम्यान गाड्या बंद पडत असल्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक वेळा गिअर बॉक्स तुटणे, गाडीचे चाक निखळून जाणे, स्टेरिंग लॉक होणे, वायरींग जळणे, टायर फुटणे आदी घटना वारंवार घडत आहेत.

ST bus caught fire
Warud APMC Election News : काॅंग्रेससोबत हातमिळवणी करून अखेर खासदार बोंडेंनी जिंकली वरूड बाजार समिती !

प्रवाशांना जीव अक्षरशः: धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. एसटीचे (ST) सुरक्षित प्रवासाचे ब्रीद आता धोक्याचे झाले आहे. एसटीच्या प्रवासात महिलांना सवलत दिल्यापासून महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. पण प्रवासात बसेस खराब होण्याच्या घटना वाढल्या तेव्हापासून महिला प्रवाशांचाही कल एसटीकडे कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com