Warud APMC Election News : काॅंग्रेससोबत हातमिळवणी करून अखेर खासदार बोंडेंनी जिंकली वरूड बाजार समिती !

MLA Devendra Bhuyar : शेतकरी परिवर्तन गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले.
Warud APMC, Dr. Anil Bonde
Warud APMC, Dr. Anil BondeSarkarnama
Published on
Updated on

Amravati District's Warud APMC Election Result News : अमरावती जिल्ह्यातील वरूड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काल (ता. ३० एप्रिल) झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत खासदार अनिल बोंडे व माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्या सहकार पॅनलने सत्ता मिळविली आहे. सहकार पॅनलचे १५ उमेदवार निवडून आले. (15 candidates of cooperation panel were elected)

सत्ता कायम ठेवण्यात काँग्रेसला यश आले आहे. या निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, आमदार देवेंद्र भुयार व माजी सभापती गिरीष कराळे यांच्या शेतकरी परिवर्तन गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. राज्याचे माजी कृषी मंत्री व खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची असलेली ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. डाॅ. बोंडेनी काॅंग्रेसशी हातमिळवणी करून अखेर बाजार समिती राखली. आता नरेशचंद्र ठाकरे यांचा ओढा भाजपकडे असल्याचे सांगण्यात येत आहे.

सहकार पॅनलचे नेतृत्व खासदार डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) व माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांनी केले. काल रविवारी (ता. ३० एप्रिल) रात्री उशिरा लागलेल्या निकालादरम्यान सहकार पॅनलने विजय मिळवला. सेवा सहकारी सर्वसाधारण मतदार संघात आठ, इतर मागास वर्ग मतदार संघात एक, सेवा सहकारी मतदार संघ महिला राखीव मध्ये एक. सेवा सहकारी भटक्या विमुक्त जातीमध्ये एक अशा ११ही जागांवर विजय मिळविला.

सेवा सहकारी सर्वसाधारण गटात वनराज कराळे, अमित कुबडे, मुकेश देशमुख, सुजीत पाटील, बबलू पावडे, बाबाराव मांगुळकर, बाबाराव लोखंडे, इतर मागास वर्ग मतदार संघात अंकुश पाटील, महिला राखीव मतदार संघात रोशनी मानकर अर्चना मरूमकर, विमुक्त जाती भटक्या जमती मतदार संघात प्रणय सोंडे विजयी झाले. हमाल मापारी मतदार संघात सहकार पॅनलचे नरेंद्र पांडव विजयी झाले तसेच व्यापारी गटात राजीव व जाबीर खान विजयी झाले.

Warud APMC, Dr. Anil Bonde
Dhamangaon APMC Election Result : धामणगावात माजी आमदारांनी विद्यमान आमदारांना चारली धूळ !

सेवा सहकारी मतदार संघातील ११ हमाल मापारी मतदार संघातील एक व्यापारी मतदार संघातील दोन, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघात एक अशा एकूण १५ जागांवर सहकार पॅनलने विजय मिळविला. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघात शेतकरी परिवर्तन पॅनलचे प्रमोद ऊर्फ बाळू पाटील व प्रशांत बहुरूपी विजयी झाले. ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मधून हिराकांत उईके विजयी झाले.

ग्रामपंचायत मतदार संघातून संघातून सहकार पॅनलचे प्रवीण मानकर विजयी झाले. ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती गटात शेतकरी (Farmer) परिवर्तन पॅनलचे हिराकांत उईके विजयी झाले. या निवडणुकीत (APMC Election) प्रहार जनशक्ती पक्षाने ग्रामपंचायत सर्व साधारण मतदार संघात उमेदवार उभा केला होता. पण उमेदवार निवडून आणण्यात यश आले नाही.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com