Women's Day : भाजप आयोजित कामगार कल्याणच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी; महिला ठार

Nagpur Stampede : उपराजधानीतील रेशीमबाग परिसरातील सुरेश भट सभागृहात सुरू होता कार्यक्रम. नियोजनाअभावी अपघात घडल्याची टीका
Nagpur Stampede Suresh Bhat Hall
Nagpur Stampede Suresh Bhat HallSarkarnama

Women's Day : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवस अगोदर उपस्थिती नोंदविलेल्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य तीन महिला जखमी झाल्या. उपराजधानी नागपूर येथील सुरेश भट सभागृहात ही दुर्दैवी घटना शनिवारी (ता. 9) घडली. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाजवळच असलेल्या सुरेश भट सभागृहात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक दिवस अगोदरच म्हणजे शुक्रवारी (ता. 8) भट सभागृहात आयोजित कार्यक्रमासाठी याच सभागृहात आले होते. शनिवारी दुसऱ्या दिवशी येथे कामगार कल्याण मंडळाच्या वतीने स्वयंपाक घरातील साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

प्रत्येक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार कल्याण मंडळाच्या या कार्यक्रमाला सकाळी दहा वाजता सुरुवात होणार होती. साहित्य वाटप होणार असल्याचा व्यापक प्रचार, प्रसार नागपूर शहरात करण्यात आला होता. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी सुरेश भट सभागृहात झाली होती. सकाळी नियोजित वेळेपेक्षा विलंबाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर महिलांची गर्दी वाढतच गेली. सभागृहात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे गोंधळात भर पडत गेली. त्यानंतर काही वेळातच चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. या गर्दीत अनेक महिला कामगार सापडल्या. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहात साहित्य वाटप थांबविण्यात आले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nagpur Stampede Suresh Bhat Hall
Women's Day : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या नावातच करून टाकला बदल

किचन साहित्य घेण्यासाठी गर्दीत शिरलेल्या एक वृद्ध महिला भोवळ येऊन कोसळली. उपचार मिळण्यापूर्वीच या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तीन महिला भोवळ येऊन कोसळल्याने जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलिस आणि वैद्यकीय पथकांनी सुरेश भट सभागृहाकडे धाव घेतली. हा कार्यक्रम जरी कामगार कल्याण मंडळाचा होता तरी त्याच्या आयोजनामागे भाजप नागपूर शहर असल्याचे सांगण्यात येत आहे. याचवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 61 वर्षीय मनू तुलसीराम राजपूत यांना प्राण गमवावे लागले. चेंगराचेंगरी झाली, त्यावेळी भाजपचे काही नेते, कामगार कल्याण विभागाचे अधिकारी आणि पोलिसही उपस्थित होते. चेंगराचेंगरी झाल्यानंतर साहित्य वाटपाचा कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे. घटनेनंतर तातडीने विखुरलेल्या चपला आदी स्वच्छ करण्यात आल्या.

भाजपचा सहभाग?

भाजपचे महानगर अध्यक्ष जितेंद्र ऊर्फ बंटी कुकडे यांनी 8 ते 11 मार्चदरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरेश भट सभागृहात किचन साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले होते. त्यानंतर संजय बंगाले, छोटू बोरकर, किशोर वानखे यांनी आवाहन करीत नोंदणीकृत श्रमिकांना शिबिरात सहभागी होत साहित्य वाटपाचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शनिवारी सकाळी सातपासूनच सुरेश भट सभागृहाबाहेर श्रमिकांची मोठी गर्दी झाली हाती. सभागृहाचे फाटक उघडताच अनियंत्रित गर्दी सभागृहात शिरली. त्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली.

Edited By : Prasannaa Jakate

R

Nagpur Stampede Suresh Bhat Hall
Women's Day 2024 : पॉवरफुल नेत्यांच्या पाठीशी असलेली 'वुमन पावर...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com